आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईत होणार बुद्धिबळ ऑलिम्पियाड:औरंगाबादेतील स्पर्धेत देवांश, शुभ, आर्यन, साक्षीला विजेतेपद

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ महासंघाद्वारे 44 व्या बुध्दीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे 28 जुलै ते 10 ऑगस्टदरम्यान चेन्नई येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व औरंगाबाद चेस अकॅडमीतर्फे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध गटात साक्षी चव्हाण, देवांश तोतला, शुभ समदानी यांनी शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

सुतगिरणी चौकातील विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या स्पर्धेत 90 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ऑलिम्पियाडमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये क्रीडा ज्योतही काढण्यात आली आहे. भारतातील आघाडीच्या खेळाडूंवर सर्वांचे लक्ष्य असेल.

विजेत्या खेळाडूंचा सत्कार

विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्राचे वितरित करण्यात आले. यशस्वी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कचरे, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, क्रीडा मार्गदर्शक सचिन पुरी, पुनम नवगिरे, औरंगाबाद चेस अकादमीचे अमरीश जोशी, मुख्य पंच पुष्कर डोंगरे, केतन अवलगांवकर यांनी अभिनंदन केले.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे

7 वर्षांखालील गट - देवांश तोतला (प्रथम), सान्वी कसात (द्वितीय), गार्गी ढेबळे(तृतीय), निव बन्साळी (चतुर्थ). 9 वर्षाखालील गट - शुभ समदानी (प्रथम), भक्ती गवळी (द्वितीय), रेयान लोहाडे (तृतीय), आर्यन चक्रबर्ती (चतुर्थ), ध्रुव कोकणे (पाचवा). खुला गट - साक्षी चव्हाण (प्रथम), आर्यन सोनवणे (द्वितीय), वेदांत कुलकर्णी (तृतीय), राजवर्धन झंवर (चतुर्थ), वेद जाधव (पाचवा).

बातम्या आणखी आहेत...