आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनने मागील १० वर्षांत अनेक बदल घडवले. या माध्यमातून ५४ शाळांतून ३० हजार विद्यार्थी आणि दीड लाख नागरिकांना मोबाइलचा वापर, व्यसनमुक्ती, सकारात्मक पालकत्वाचे फायदे सांगितले. याशिवाय ऊसतोड कामगार, मजूर यांच्या ३ मुलांना डॉक्टर, ३ मुलांना सीए, तर ९ मुलांना इंजिनिअर बनवले. एवढेच नाही तर एक विद्यार्थी आता एमएसची तयारीही करत आहे.
फाउंडेशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष विवेक रांदड यांनी फाउंडेशनच्या कार्याची भूमिका, प्रवास आणि भविष्याबद्दल माहिती दिली. या वेळी आकाश फुलझळके याने चेतना फाउंडेशनमुळे जीवनात झालेल्या कायापालटाचा प्रवास मांडला. राहुल शिंदे आणि तुषार बाबजे यांनीही फाउंडेशनने उचललेल्या जबाबदारीविषयी आभार मानले.
१० शाळांमध्ये नीतिमूल्यांचे धडे
आत्मविश्वास कसा वाढवावा, जीवनाचे लक्ष्य कसे ठरवावे यासारखी मूल्ये १० जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवली जातात. आनंदी व शांतिमय जीवन कसे जगावे याविषयीही मार्गदर्शन केले जाते. जून २०२२ पासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
स्व-सशक्तीकरण कार्यशाळा
चेतना हॅपी व्हिलेजमध्ये दरवर्षी लहान मुलांचे संस्कार शिबिर, दांपत्यांसाठी पॉझिटिव्ह पॅरेंटिंग तर युवक कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या वेळी माजी आमदार कल्याण काळे, ज्ञानप्रकाश मोदाणी, सत्यनारायण लोहिया उपस्थित होते.
गरजूंना देतोय शिक्षण आणि संस्कार
जाती-धर्माचा विचार न करता प्रत्येक गरजू मुलाला शिक्षण आणि मूल्यसंस्कार देण्यासाठी संस्था कार्यरत आहे. सध्या संस्थेत ३० मुलांचे शिक्षण सुरू आहे. यंदाच्या वर्षात आम्ही मोबाइल वापरावर जाणीवपूर्वक कार्यक्रम राबवत आहोत. -मुरली गुंगे, सचिव,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.