आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध अपघातात 4 जण ठार:मृतात सिल्लोडमधील 15 वर्षीय मुलासह, वैजापूर तालुक्यातील तरुणाचा समावेश

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले. मृतात सिल्लोड तालुक्यातील पंधरा वर्षीय मुलगा तसेच तरुणाचा समावेश आहे तर वैजापूरच्या एका अठरा वर्षीय तरुणासह पाथर्डी तालुक्यातील 36 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सिल्लोडमध्ये अपघातात मुलगा ठार

शिवसेना भवन कार्यालयासमोर सिल्लोड येथे ट्रकने धडक दिल्याने पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला हा अपघात 28 फेब्रुवारीला घडला. याप्रकरणी ट्रक चालका विरोधात एक मार्च रोजी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, महेश कौतिक ताजणे (वय 15, रा. माऊलीनगर, सिल्लोड) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील कौतिक हरीभाऊ ताजणे यांनी तक्रार दिली. फिर्यादीत नमूद आहे की ट्रक चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवला भराडी फाट्याकडून सिल्लोडकडे येणाऱ्या महेशच्या दुचाकीला धडक देऊन त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. त्यानुसार ट्रक क्रमांक (जी. जे. 3, बी. टी. 8315) च्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेळणा फाट्यावर अपघात, तरुण ठार

दुसऱ्या अपघातात पिकअप वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीला धडक दिल्याने रामेश्वर कैलास दौड (वय 23) याचा मृत्यू झाला. हा अपघात पालक शिवार खेळणा फाट्याजवळ (ता. सिल्लोड ) येथे 15 फेब्रुवारीला घडला. याप्रकरणी एक मार्च रोजी ग्रामीण सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार वाहन चालक जुनेद फईम शेख (रा. वरुड काजी, ता. जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात ज्ञानेश्वर कैलास दौड यांनी तक्रार दाखल केली.

येवला रोडवर अपघातात तरुणाचा मृत्यू

तिसरा अपघात येवला रोड उकडगाव फाटा (ता. वैजापूर) येथे एक मार्च रोजी घडला. या अपघातात माधव लहानु गायधने (वय 18 रा. ढोकनांदूर , ता. वैजापूर) या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलाचे वडील लहानू मुरलीधर गायधनी यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नानासाहेब साळुंखे यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन क्रमांक (एम. एच .17, बि.डी. 2425 ) हे निष्काळजीपणे चालवले व माधव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. अशा तक्रारीनुसार, वाहनचालक नानासाहेब बबन साळुंखे (रा. चित्तरखेडा) याच्याविरुद्ध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

ढोरकिन येथे अपघातात 36 वर्षीय तरुण ठार

चौथा अपघात एक मार्च रोजी ढोरकिन (ता. पैठण) येथे घडला. यात संजय माणिक पालवे (वय 36 रा. बडेवाडी, ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर) या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर संजय पालवे यांना पैठण येथील सरकारी दवाखान्यात नेले असता डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...