आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझाद चषक टी-20 स्पर्धा:बेनेक्स स्पोर्टसचा रोमांचक विजय, केसर सुपरला हरवले

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लकी क्रिकेट क्लबतर्फे आयोजित आझाद चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यात बेनेक्स स्पोर्टस संघाने विजय मिळवला. नवल टाटा स्टेडियमवर झालेल्या लढतीत बेनेक्सने केसर सुपर संघावर 10 धावांनी मात केली. या सामन्यात बिलाल पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बेनेक्सने 20 षटकांत 9 बाद 158 धावा उभारल्या. यात आघाडीचे तीन फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. शेख सादिक (8), कर्णधार रियाज बागवान (6) व सादिक पटेल (0) हे मोठी खेळी करुन शकले नाहीत. इम्रान पटेलने शानदार अर्धशतक झळकावत संघाचा डाव सावरला. त्याने 47 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार खेचत सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. मो. हिलाबीने सुशिल अराखच्या हाती त्याला झेल बाद केले. नदीम अन्सारी 9 धावांवर परतला. शाहरुखने 30 चेंडूंत 2 चौकारांसह 21 धावा केल्या. परवेझ खानने 17 चेंडूंत 1 चौकारासह 15 धावा काढल्या. इम्रान अहमदने 5 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचत 14 धावा ठोकल्या. केसरकडून अखिल शेखने 30 धावा देत 2 गडी बाद केले. गुड्डू नेहरी, मो. हिलाबी, सय्यद असद अली, सलमान खान यांनी प्रत्येकी एक एक गडी टिपला.

बिलाल पटेलने चौघांना केेले बाद

प्रत्युत्तरात केसर सुपर संघ निर्धारित षटकांत 8 बाद 148 धावा करू शकला. बेनेक्सच्या बिलाल पटेलने भेदक गोलंदाजी करत केसरच्या चार फलंदाजाना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे त्यांचा डाव दिडशे धावांच्या आत ढेपाळला. इक्बाल खानने 9 चेंडूंत 3 चौकारांसह 15 धावा केल्या. आकाश विश्वकर्माने 24 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचत सर्वाधिक 44 धावा काढल्या. इनायत देशमुखने 28 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 23 धावा जोडल्या. नौशाद हाश्मीने 30 चेंडूंत 34 धावांचे योगदान दिले. बेनेक्सच्या सय्यद अब्दुल वाहिदने 2 व इम्रान पटेलने 1 गडी बाद केला.

बातम्या आणखी आहेत...