आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज 'शहर बंदची हाक':महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे आंदोलन; लोकविकास परिषद काढणार मोर्चा

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले आहे. यावरुन जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयाला काही जणांनी विरोध केला असून त्या विरोधात गेली 7 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तर आज शहर बंदची हाक महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात शहरात वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे. याच आंदोलनाचा भाग काल औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीच्या वतीने गुरुवारी शहरात कँडल मार्च काढण्यात आला होता.

तर आज महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर दुपारी लोकविकास परिषदेतर्फे आज भडकलगेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

इम्तियाज जलील म्हणाले की, माझे नाव तुम्ही शहराला देऊन मला मोठे करा असे संभाजी महाराजांनी सांगितले होते का? ते महापुरूष आहेत यात काहीही दुमत नाही. त्यांचा आदर करण्यात कोणताही वाद नाही, पण त्याबाबत सुरू असणाऱ्या राजकारणाविषयी आक्षेप आहेत.

संबंधित वृत्त वाचा

औरंगजेबाची घोषणा देणाऱ्यांवर 'एमपीडीए' लावा:छत्रपती संभाजीनगरप्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या औरंगाबादच्या नामांतराविरोधी खासदार इम्तियाज जलील यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनात औरंगजेबाचे फलक झळकले आणि औरंगजेबाच्या नावाने घोषणाबाजी झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घोषणा देणाऱ्यांवर 'एमपीडीए' लावा अशा सूचना दिल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 मार्चपासून खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी संघर्ष समितीतर्फे औरंगाबादच्या नामांतराविरोधात आंदोलन सुरू आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...