आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर जिल्हा फुटबॉल लीग स्पर्धेत सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात अरब बॉईज संघाने नोबल अकादमी संघावर दणदणीत विजय मिळवला. दुसीरकडे, गोल्डन शायर आणि गोगानाथ एफ. सी. या संघात झालेल्या चुरशीच्या लढतीत गोगानाथ एफ. सी. संघाने गोल्डन शायर संघावर मात करत विजयी आगेकुच कायम ठेवली. छत्रपती संभाजीनगर फुटबॉल संघटनेच्या अडॉक कमिटीच्या वतीने या लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
छावणीतील गांधी मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल लीग स्पर्धेत आज गोल्डन शायर विरुद्ध गोगानाथ एफ. सी. असा अत्यंत रोमांचक असा सामना रंगला होता. या सामन्यात गोगानाथ एफ. सी. संघातील साजन या खेळाडूने अखेरच्या क्षणी रोमहर्षक गोल केल्याने प्रतिस्पर्धी संघावर 1-0 असा विजय मिळवला. विजयी संघातील हिरो ठरलेल्या साजन याला सामनावीर घोषित करण्यात आले.
अरबाज, समीरची चमकदार कामगिरी :
दुसरा सामना अरब बॉईज आणि नोबल अकादमी यांच्या रंगला. हा सामना अरब बॉईज संघाने 2-0 अशा गोल फरकाने आपल्या नावे केला. विजयी संघातील अरबाज आणि समीर अल हमीद यांनी प्रत्येकी एक एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तसेच विजयी संघातील अबू बकरने संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी संघाला अचुक पासिंग करत खेळ वेगवान केला. त्याचा फायदा संघाला झाला.
अबूच्या सहकार्यामुळे संघाला दोन गोल करता आले. अबूला मान्यवरांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देवून गौरवण्यात आले. त्याचबरोबर, इतर एका सामन्यात यंग बॉईज विरुद्ध साई एफ. सी. भिडले. हा सामना यंग बॉईज संघाने 1-0 असा जिंकला. दोन्ही संघातील खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.