आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असोसिएशन ऑफ विंग चुनच्या वतीने ग्रेड बेल्ट परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परिक्षेत 41 विंग चुन मार्शल आर्टपटूंनी यश मिळवत ग्रेड बेल्ट मिळवला. बंजारा कॉलनी येथील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय येथे सोहळा पार पडला. यामध्ये खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बेल्ट वितरण व पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी खेळाडूंनी चित्तथराकर प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरीरसौष्ठवपटू विक्रम जाधव आणि प्रमुख पाहुणे म्हणून राजेश चव्हाण, राज्य संघटनेचे सचिव रामेश्वर चायल, राजेंद्र जाधव, संदीप शेळके, राज्य अध्यक्ष श्याम अंभोरे यांची उपस्थिती होती.
यशस्वी खेळाडू
यलो बेल्ट - सुशांत तारव, सान्वी ताकवाले, अन्वेश नारखेडकर, अनुष्का सातदिवे, वैभवी चादरे, प्रांजल विनय, आराध्य थेटे, समर्थ लांडगे, मुदिता दांडगे, आक्षदा चिंचोलकर, अस्मी कुलकर्णी, आेम अधाने, श्रेया नांगरे, सिद्धी गवई, श्रद्धा गवई, राघव जाधव, श्रेया गोरे, यश खरात, लवकेश गवई, तन्वी गवई, विराट इंगळे.
ऑरेंज बेल्ट - ऋतुराज मगर, वेदीका नागरे, आनंदश्री धिवर, साहिल उबाळे. ग्रीन बेल्ट - रेयांश खंडेलवाल, हर्ष भट्टड, हितांश भट्टड. ब्लू बेल्ट - नेतल अग्रवाल, यशराज राठोड, तन्वेश जाधव.
ब्राऊन बेल्ट - प्रज्ञा चाबुकस्वार, साक्षी जाधव, काजल बनसोडे, अगस्त्य राठोड, जय बनसोडे, सोहम जाधव, अर्णव चव्हाण, प्रतीक चाबुस्कवार, अभिराज राठोड, प्रणव सस्ते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.