आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाफना ज्वेलर्सवर जीएसटीचे छापे:करचोरी प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात कारवाई; दुकान बंद करून दुसऱ्या दिवशीही झाडाझडती

छत्रपती संभाजीनगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर शहतील सुप्रसिद्ध अशा रतनलालजी बाफना ज्वेलर्सवर जीएसटीने छापे टाकलेत. गेल्या दहा तासांपासून व्यवहारांची झाडाझडती सुरू आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

​जीएसटीकडून या प्रकरणी अजून कसलिही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तसेच बाफना ज्वेलर्सकडूनही कसलिही प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र, या कारवाईने सराफा व्यापरांचे धाबे दणाणले आहेत.

नेमके प्रकरण काय?

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या कारवाईचा बडगा असतानाच करचोरी प्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरातील बाफना ज्वेलर्स या दुकानावर जीएसटीच्या वसुली पथकाने छापा घातला आहे. शहरातील जालना रस्त्यावरील बाफना ज्वेलर्सच्या शाखेवर हा छापा टाकण्यात आला.

शुक्रवारपासून चौकशी सुरू

पथकाने शुक्रवारी सुमारे 10 तास अधिकाऱ्यांनी दुकानातील व्यवहारांची चौकशी केली. त्यानंतर आज देखील कारवाई सुरूच असून, या काळात सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापकांना दुकानातच थांबवण्यात आले. तर शुक्रवारी दुपारनंतर दुकानाचे मालक शहरात पोहोचल्यावर पुढील चौकशी करण्यास सुरुवात झाली. दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजही ही चौकशी सुरू आहे.

कागदपत्रांची तपासणी

कर चोरीप्रकरणी जीएसटीच्या वसुली पथकाने ही छापेमारी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारवाईसाठी आलेल्या पथकाने सुरुवातीला दुकानातील सर्व फोन बंद करून, त्यानंतर चौकशी सुरू केली. तसेच या पथकाने दुकानातील ज्वेलरी खरेदी-विक्री संबधित कागदपत्रे तपासली आहे. सोबतच वेगवेगळ्या बिलांची तपासणी करण्यात येत असून भरलेल्या जीएसटीबाबत चौकशी केली जात आहे.

सराफाने कर चोरल्याचा जीएसटी पथकाला संशय असून, त्यानुसार चौकशी केली जात असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. तर या कारवाईबाबत जीएसटी विभागाकडून अजूनही कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...