आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळपिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यातही नऊ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.अवकाळी पावसामुळे मराठवड्यात 25 जनावराचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळपासून मराठवाड्यात रिमझिम पाऊस सुरू आहे.
जनावरांचा मृत्यू
विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 7 एप्रिल रोजी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. यामध्ये जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. यामध्ये सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा येथे एकाचा वीज पडून मृत्यू झाला. अंबादास भिका राठोड असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शिरसाळा गावातच 5 गाई वीज पडून मृत झाल्या आहेत. तर सोयगाव तालुक्यात वरखेडी या गावात 3 व्यक्ती वीज पडून जखमी झाल्या आहेत.
वीज पडून मृत्यू
कन्नड: 1 बैल वीज पडून मृत
लोहगाव: 2 बैल वीज पडून मृत
.देवपूर आणि ता.फुलंब्री: 1 बैल वीज पडून मृत
रा.रांजणगाव ता.पैठण :1 गाय व 1 बैल वीज पडून मृत
जालना : गाय वीज पडून मृत
रा. कडवंची, भोकरदन : 1बैल वीज पडून मृत
रा. वालसावंगी 1 गाय वीज पडून मृत
किती झाला पाऊस?
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ५ जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यात सरासरी चार मिमी पाऊस झाला आहे. यामध्ये जालना 4.9 मिमी पाऊस झाला आहे. तर नांदेडमध्ये 4.9 मिमी पाऊस झाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.