आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज़ जलील यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक:युवामोर्चाकडून छत्रपती संभाजीमहाराज चौकात जलील यांचा पुतळ्याचे दहन

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली 3 दिवस एमआयएमतर्फे छत्रपती संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद नामांतर व्हावे यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याला विरोधम्हणून भाजपने देखील छत्रपती संभाजीमहाराज चौक इथे एमआयएमच्या विरोधात आज जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी खासदार इम्तियाज़ जलील यांची पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राजगौरव वानखेडे यांच्या नेतृत्वात आज शहरातील छत्रपती संभाजीमहाराज चौकात खासदार जलील यांच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना वानखेडे म्हणाले की, एमआयएम सारख्या जातीयवादी संघटना शहराचे वातावरण खराब करण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही असे होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.

शिवसैनिकांना मदतीची गरज पडते?

खासदार जलील यांनी भाजपच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या खांद्यावर बसून जर कुणाला मोठे व्हायचे असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. तर आमदार संजय शिरसाट आणि प्रदीप जैस्वाल यांच्या मागणीवर खासदार जलील म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंना कधीच पंतप्रधानांना पत्र लिहण्याची गरज पडली नाही. शिवसैनिकांना मदतीची गरज पडते का? असा सवाल उपस्थित केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशी होती का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दानवेंना लगावला टोला

अंबादास दानवे यांनी खासदार इम्तियाज़ ​​​​​​​जलील यांची खासदाराकी रद्द करण्याची मागणी केली यावर बोलताना इम्तियाज़ ​​​​​​​जलील म्हणाले की, अंबादास दानवे यांचे पद सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राहिल का नाही हाच मोठा प्रश्न आहे, त्यांनी माझे पद काढून घेण्यावर बोलणे कितपत योग्य आहे असा टोला जलील यांनी लगावला आहे.

छत्रपती संभाजीनगर नामांतरास विरोध करणाऱ्या इम्तियाज़ जलील यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजगौरव वानखेडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हर्षवर्धनजी कराड, महेश माळवतकर, सागर पाले, सरचिटणीस दीपक खोतकर, पंकज साखला, पवन सोनवणे, विजय बरस्वमवार, बाबासाहेब गवळी, समीर लोखंडे, राज राठोड, राहुल दांडगे, अक्षय म्हात्रे, शैलेश हेकाडे, पूजाताई सोनवणे, प्रतिभाताई जऱ्हड, श्रीचंद जाधव, रोहितकुमार साबळे, मुकेश मुकेश चित्रक, भीमा धर्मे, सुनील वाणी, मुकेश जैन, बंडू ठुबे, शिवाजी भिंगारे, पूजाताई सोनवणे, तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...