आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:पैठण बाजार समिती मंत्री संदीपान भुमरेंच्या ताब्यात; 18 जागांवर उमेदवार विजयी, मविआला धोबीपछाड

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण बाजार समितीचे निकाल स्पष्ट झाला आहे. यात सर्वच 18 जागांवर शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले आहे. 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मविआला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. यामुळे पैठणमध्ये मंत्री संदीपान भुमरेंनी आपले चर्चस्व कायम ठेवले आहे.

छत्रपती संभाजीनगरातील 7 बाजार समितीची निवडणूक पार पडली. यात पैठण बाजार समीतीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात सर्वच्या सर्व जागांवर मंत्री संदीपान भुमरे यांच्या गटाने विजय मिळवला आहे.

पैठण चर्चेतच

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी शिंदे यांच्यासह जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काळात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतत्यातच गेल्यावेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन महत्वाच्या आणि मोठ्या ग्रामपंचायतमध्ये भुमरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे भुमरे यांनी संपूर्ण ताकद लावत अखेर, बाजार समिती आपल्या ताब्यात आणली आहे. पैठण विधानसभेची या माध्यमातून एक प्रकारे रंगीत तालीम भुमरेंकडून करण्यात आली की असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

सेवा सहकारी संस्था मतदारसंघ

  • एरंडे राम कोंडीराम (सर्वसाधारण)
  • घनवट गंगासागर भिमराव
  • हजारे शशिकलाबाई परसराम (महिला राखीव)
  • जाधव शिवाजी नाथा (इतर मागासवर्गीय)
  • व्होरकटे साईनाथ विष्णु (विमुक्त जाती-भटक्या जमाती)
  • तवार संभाजी शिवाजी (सर्वसाधारण)
  • तांबे राजेंद्र एकनाथ (सर्वसाधारण)
  • दोरखे विठ्ठल लक्ष्मण (सर्वसाधारण)
  • नरके शरद अशोक (सर्वसाधारण)
  • बोंबले बद्रीनाथ धोंडीराम (सर्वसाधारण)
  • मुळे सुभाष माणिकराव (सर्वसाधारण)

हमाल मापाडी मतदारसंघ

  • टेकाळे राजू उत्तमराव

ग्रामपंचायत मतदारसंघ

  • मोगल सचिन भाऊसाहेब (सर्वसाधारण)
  • खराद मनिषा नामदेव (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)
  • भुमरे राजू आसाराम (सर्वसाधारण)
  • कारके भगवान सर्जेराव (अनु. जाती-जमाती)

व्यापारी मतदारसंघ

  • काला महावीर मदनलाल
  • मुंदडा महेश रामनारायण