आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार देण्यासाठी शाळांवर उसनवारी करण्याची वेळ आली आहे. कारण पोषण आहारासाठी लागणारे डाळ, तांदुळ, तेल, तीखट मीट संपले. शासन स्तरावरुन या पोषण आहारासाठीच्या साहित्यासाठीच्या करार प्रक्रिया न झाल्याने आहाराचे वाटप शाळांमध्ये ठप्प झाले आहे. यामुळे जवळच्या शाळा तसेच लोकसहभागतून मुलांना मध्यांन्ह भोजन देण्याची वेळ शाळांवर आली आहे.
मार्च महिना सुरु झाला असून, आता शाळांना सुट्या लागण्यासाठी दीड महिन्यांचा अवधी बजून बाकी आहे. यामुळे जिल्हयातील ३१६५ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची सोय व्हावी अशी मागणी आता शिक्षकांकडून होते आहे.
प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोषण योग्य पद्धतीने व्हावे. त्यांनी शाळेत नियमित उपस्थित रहावे यासाठी शालेय पोषण आहार योजना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली. या योजने अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील ३१६५ शाळांमधील ४ लाख ६५ हजार ८६२ विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे पोषण आहार वाटपात अडचणी होत्या. शाळा सुरु झाल्यावर मात्र नियमित पोषण आहार सुरु झाला. त्यात पुन्हा स्वयंपाकी व मदतनीसांचे मानधन थकल्याने पोषण आहार बंद झाला होता.
यात आता पुन्हा भर पडली असून, शासन स्तरावर कराराची प्रक्रिया न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी उसनवारी करण्याची वेळ शाळांवर आली आहे. आधीच स्वयंपाकाचा गॅस तेल महाग झाले आहे. अजून शाळांना सुट्या लागण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी बाकी असतांना शाळांना डाळ, तांदुळ, तिखट, मीट, तेल संपल्याने लोकसहभाग आणि जवळच्या शाळांकडून मदत घ्यावी लागत आहे. तर काही शाळांमध्ये थोडाफार पुरवठा बाकी आहे. मात्र दीड महिन्यांपासून अशीच परिस्थिती कायम आहे. यावर शाळांनी आता शाळांना सुट्या लागेपर्यंतच्या पोषण आहाराची तरतुद करण्यात यावी अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.
शालेय पोषण आहार पात्र विद्यार्थी संख्याा ४ लाख ६५ हजार ८६२ तर एकूण शाळांची संख्या ३१६५ यांना विद्यार्थी संख्येनुसार प्रती विद्यार्थी पहिली ते पाचवीसाठी १०० ग्रॅम तांदुळ, २० ग्रॅम दाळ प्रमाण तर सहावी ते आठवीसाठी १५० ग्रॅम प्रती विद्यार्थी तांदुळ, ३० ग्रॅम दाळ असे प्रमाण आहे. पटसंख्येनुसार या आहाराचे वाटप होते.
करारामुळे वाटप थांबले
शासन स्तरावरुन कराराची प्रक्रिया थांबलेली असल्यामुळे शालेय पोषण आहार वाटप थांबला आहे. यासंदर्भात आज उद्यामध्ये वाटप सुरु होईल. सध्या ६० ते ६५ शाळांमध्ये लोकसहभाग आणि मदतीतून पोषण आहार सुरु आहे.'' - भाऊसाहेब देशपांडे, शालेय पोषण आहार प्रभारी अधिकक्षक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.