आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीला धक्का:कदीर मौलाना यांचा बीआरएस पक्षात प्रवेश; राष्ट्रवादीकडून लढवली होती विधानसभा निवडणूक

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाला मराठवाड्यात जोरदार पाठिंबा मिळतोय. यात छत्रपती संभाजीनगरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदरी मौलाना यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि वैजापूरचे 2019 चे राष्ट्रवादीचे उमेदवार अभय पाटील चिकटगावकर यांनी देखील बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरात बीआरएस पक्षामध्ये 3 मोठे नेते दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

2014 मध्ये दिला होता राजीनामा

पक्षाचे नेतृत्व अल्पसंख्याक समाजाची फसवणूक करणारे आहे, अशी तोफ डागत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातून तिकीट नाकारलेले अब्दुल कदीर मौलाना यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे म्हणत 2014 ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. शहराच्या मध्य मतदारसंघात 2009 च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. 2015 ला मनपाच्या निवडणुकीनंतर त्यांनी ‘आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यशैलीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत होत आहे. पक्षात कोणी मोठे होऊ नये असा प्रयत्न ते सातत्याने करत आले आहेत असा आरोप केला होता.

नांदेड जिल्ह्यात केसीआर यांच्या आतापर्यंत दोन सभा झाल्या. या माध्यमातून अनेक माजी आमदार, पदाधिकारी त्यांच्या गळाला लागले. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आणखी दोन राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी असलेल्या कदीर मौलाना, अभय पाटील चिकटगांवकर यांनी बीआरएस सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.