आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरु झाली आहे. विद्यार्थी परीक्षेला जाण्यापूर्वी काय करतील याचा नेम नसतो. दहावीच्या विद्यार्थ्यांनी पेपरला जाण्यापूर्वी सर्व नोटपॅड एकत्र ठेऊन त्याच्यापुढे दगड ठेवला आणि 'बोल भवानी की जय' म्हणत नारळ फोडला. सोशल मीडियावर यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
राज्यात कालपासून दहावीची परीक्षा सुरु झाली आहे. सकाळी 11 ते 2 या दरम्यान मराठीचा पेपर घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 15,77,256 विद्यार्थी परीक्षा देणार असून 533 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी माध्यमिक बोर्डाने संपूर्ण तयारी केली आहे.
विविध प्रकारच्या प्रतिक्रिया
छत्रपती संभाजी नगरच्या लासुर स्टेशन येथे दहावीच्या पेपरला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी नारळ फोडून पेपरची सुरुवात केली. याचा व्हिडिओ उपस्थित विद्यार्थ्यांनी शूट केला. नंतर हाच व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर करण्यात आलेला आहे. विविध प्रकारच्या प्रतिक्रिया यावर येत आहे.
कॉपीमुक्त अभियान
राज्यात यंदा कॉपीमुक्त अभियान राबवले जात असून त्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षा चांगली जावी यासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करताना दिसतात. अनेकजण पास होण्यासाठी देवीदेवताना नवसही कबूल करतात.
तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती
मंडळाने यापूर्वीच जाहीर केल्यानुसार परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहोचण्याची सूचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षेस सामोरे जाण्यासाठी राज्य मंडळ तसेच विभागीय मंडळ स्तरावर आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेकडून तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.