आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचे दुर्लक्ष:हज हाऊस लोकार्पणाच्या प्रतीक्षेत, मराठवाड्यातील भाविकांत नाराजी, 29 कोटींचे बजेट 44 कोटींवर

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि अहमदनगर भागातील हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांना सुविधा देण्याच्या उद्देशाने २०१३-१४ मध्ये तत्कालीन राज्य शासनाने किलेअर्क भागात हज हाऊसच्या बांधकामाचे आधी २९ कोटी रुपयांचे बजेट तयार केले होते, ते नंतर ४४ कोटींवर पोहोचले.

एक दशक उलटले तरी या ना त्या कारणाने हज हाऊसचे अजूनही लोकार्पण झाले नाही. दहा वर्षांत तीन सरकारे बदलली, परंतु हज हाऊसचे लोकार्पण होत नसल्याने शहर तसेच मराठवाड्यातील भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हज हाऊससाठी मागील दहा वर्षांत ४४ कोटी खर्च करण्यात आले. हज हाऊस व त्याशेजारील वंदे मातरम सभागृहाचे भूमिपूजन एकाच वेळी करण्यात आले होते. दोन्ही इमारतींचे एकाच वेळी लोकार्पण करण्याचे जाहीर करण्यात आले होते. वंंदे मातरम हॉलचे तीन महिन्यांपूर्वी लोकार्पण झाले.

हज हाऊस मात्र अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. बांधकामासाठी ९ कोटी ३ कोटी मंजूर झाले. आता शेवटच्या टप्प्यातील कामासाठी २ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काम पूर्ण झाले आहे. परंतु राज्य शासनाच्या वतीने आतापर्यंत लोकार्पणासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरू नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. किलेअर्क येथील हज हाऊस यात्रेकरूंच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

हज यात्रेकरू मक्का आणि मदिना येथे जाण्यापूर्वी मे महिन्यात त्याचे उद्घाटन केल्यास त्याचा फायदा संपूर्ण मराठवाड्यातील भाविकांना होईल. हज हाऊसचे लोकार्पण त्वरित करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दोन एकरचा परिसर, ६०० आसन क्षमतेचे प्रेक्षागृह

दोन एकर परिसरात प्रेक्षागृहात ६०० ची आसन क्षमता असलेले सभागृह, आकर्षक फर्निचर, लाइट, साहित्य, उर्दू हॉल, मशीद, मान्यवरांसाठी खोल्या, बगीचा, कारंजे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेकरूंसाठी प्रशिक्षण, निवासस्थान, वैद्यकीय सुविधा, आरोग्यसेवा, परकीय चलन, साहित्याची तपासणी, मशीद, २०० दुचाकी, १०० चारचाकी, दोन बसेस उभी करता येईल एवढे पार्किंग, उर्दू घर आणि वाचनालय इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. या भव्य इमारतीमध्ये अल्पसंख्याक विभागाचे आणि राज्य वक्फ बोर्डाचे मुख्यालय आहे.