आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालकी क्रिकेट क्लबतर्फे आयोजित आझाद चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत टीम इलेव्हनने विजय मिळवला. नवल टाटा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इलेव्हनने आझाद कॅम्पस संघावर 3 गडी राखून मात केली. या लढतीत इरफान पठाण सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आझाद संघाने 20 षटकांत 7 बाद 131 धावा उभारल्या. यात सलामीवीर उस्मान बीन हमोद 15 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकार लगावत 13 धावा करत परतला. कर्णधार अरेझ खानला 4 धावांवर असताना रिझवान अहमदनने आपल्याच गोलंदाजीवर झेल बाद केले. मो. अमनने 19 चेंडूंत 2 चौकारांसह 18 धावा केल्या.
मो. अमिनने 25 चेंडूंत 2 चौकार मारत 15 धावा काढल्या. आसिफ खान 18 धावांवर नाबाद राहिला. मोहसिन खान 13 आणि रिझवान चाऊस 12 धावांवर बाद झाला. अबरार शेखने 13 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 16 धावांचे योगदान दिले. टीम इलेव्हनच्या रिझवान अहमद आणि बी. अहमद यांनी प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले. मुस्तफा शाह व सय्यद फैजान कादरीने प्रत्येकी एकाला टिपले.
इरफान पठाणचे अर्धशतक
प्रत्युत्तरात 15.4 षटकांत 7 गडी गमावत 134 धावा करत विजय साकारला. यात कर्णधार बी. अहमदने 10 धावा केल्या. शेख वसिम भोपळाही फोडू शकला नाही. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या इरफान पठाणचे शतक अवघ्या 8 धावांनी हुकले. त्याने 45 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व 6 षटकार खेचत 92 धावांची अर्धशतकी खेळी केली.
त्याला अरेझ खानने हर्ष दुबेच्या हाती झेल बाद केले. अर्शरफ पठाण 3, रिझवान अहमद 4 व झुबेर मोहमंदी हे स्वस्तात परतले. सय्यद फैझान कादरीने 19 चेंडूंत 1 चौकारासह नाबाद 14 धावांची विजयी खेळी केली. आझादकडून असिफ खान व अरेझ खान यांनी प्रत्येकी दोन दाेन गडी टिपले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.