आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझाद चषक टी-20 स्पर्धा:एनपी अकादमीने आझाद कॅम्पस संघाला हरवले, परवेझ खान ठरला सामनावीर

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लकी क्रिकेट क्लबतर्फे आयोजित आझाद चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत एनपी अकादमीने आझाद कॅम्पस संघावर ५ गडी राखून मात केली. नवल टाटा स्टेडियमवर झालेल्या लढतीत परवेझ खान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून एनपी संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आझाद कॅम्पसने २० षटकांत ९ बाद १०२ धावा उभारल्या. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर तथा कर्णधार अरेझ भोपळाही फोडू शकला नाही. अकिब जावेदने त्याचा त्रिफळा उडवला. मो. अदनान शेख ७ धावांवर परतला. सलामीवीर उस्मान बीन हमोदने २६ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचत २४ धावा काढल्या.

रिझवान चाऊस ४ धावा करु शकला. मो. अमीनने २० चेंडूंत २ चौकारंासह १४ धावा केल्या. फरहान शेख शुन्य धावेवर बाद झाला. हरिष दुबे १३ धावांवर नाबाद राहिला. मोहसिन खानने २१ चेंडूंत ३ उत्तुंग षटकार खेचत २४ धावांची खेळी केली. आसिफ खान शुन्यावर धावबाद झाला. एनपीकडून अदिल अली बामिद्रकने ११ धावा देत ३ गडी बाद केले. अष्टपैलू परवेझ खान व अकिब जावेदने प्रत्येकी दाेन दोन गडी बाद केले.

परवेझचे अर्धशतक हुकले

प्रत्युत्तरात, एनपी क्रिकेट अकादमीने १४.५ षटकांत १०५ धावा करत विजय साकारला. यात अष्टपैलू परवेझ खानने गोलंदाजी फलंदाजीत कमाल कामगिरी केली. त्याचे अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकले. कर्णधार परवेझने ३९ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार व २ षटकार खेचत सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली.

सलामीवीर आकाश बोराडेने १७ चेंडूंत १० धावा केल्या. नदीम सय्यद ५ धावांवर हरिष दुबेचा शिकार बनला. यष्टिरक्षक फलंदाज ओम जाधवने १८ चेंडूंत १ चौकार व १ षटकार खेचत १३ धावा जोडल्या. अदिल ८ धावांवर नाबाद राहिला. आझादकडून आसिफ खानने २७ चेंडूंत ३ गडी बाद केले. मोहसिन खान व हरिष दुबेने प्रत्येकी एक एक गडी टिपला.

बातम्या आणखी आहेत...