आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालकी क्रिकेट क्लबतर्फे आयोजित आझाद चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आझाद कॅम्पस संघाने विजय मिळवला. नवल टाटा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आझादने यंग एमआर इलेव्हन संघावर ५३ धावांनी मात केली. या लढतीत रिझवान चाऊस (५५) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आझाद कॅम्पसने २० षटकांत २०१ धावांचा डोंगर उभारला. यात संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर तथा कर्णधार अरेझ खान भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर मो. अमनही ९ धावांवर परतला. सलामीवीर मो. अदनान शेख व रिझवान चाऊसने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि दोघांनी शानदार अर्धशतके झळकावली. मो. अदनानने ४९ चेंडूंत ७ चौकार खेचत सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. रिझवानने ३२ चेंडूंत फटकेबाजी करत ९ चौकारांच्या मदतीने ५५ धावा ठोकल्या.
रिझवान व अदनान जोडीने तिसऱ्या गड्यासाठी १३० धावांची शतकी भागीदारी केली. अबरार शेख ७ धावा करू शकला. मो. अमीनने १० चेंडूंत २ चौकारांसह १९ धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज उस्मान बीन हमोदने १७ चेंडूंत १ चौकार व २ षटकार खेचत २७ धावा जोडल्या. एमआरकडून अजमल मिर्झाने २ आणि शहेजान खान व शेख अबरारने प्रत्येकी एक गडी बाद केला.
यंगच्या फलंदाजांची निराशाजनक फलंदाजी
प्रत्युत्तरात यंग एमआर इलेव्हन संघ निर्धारित षटकांत ८ बाद १४८ धावा करू शकला. यात सलामीवीर अजमल मिर्झा ७ धावांवर परतला. शहेजान खान शुन्यावर बाद झाला. शेख सोहिलने ४० चेंडूंत ३३ धावा जोडल्या. मुत्झिम कोटकरने २८ आणि सलिम काझीने ११ धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. आझाद कॅम्पसकडून अरेझ खानने ३४ धावा देत ३ फलंदाज टिपले. मोहसिन खान व आसिफ खान यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.