आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैठण रोडवरील नायगाव येथील नामांकित बडवे इंजिनिअरिंग कंपनीच्या एका प्लँटमध्ये गुरुवारी आग लागली. आगीने काही क्षणातच राैद्ररूप धारण केले. शहरातील अग्निशमन विभागाकडून रात्री उशिरापर्यंत आग आटाेक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू हाेते. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बडवे समूहाची नायगाव परिसरात एक कंपनी असून त्यात वाहनांच्या पार्टसची निर्मिती केली जाते. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता कंपनीच्या एका प्लँटमधून धूर निघू लागला. हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच सर्वजण बाहेर निघाले.
त्यानंतर आग आटाेक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, कंपनीतील यंत्रणा व केमिकलमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. सात वाजेपर्यंत आगीचे मोठे लोट आकाशात दिसत होते. पदमपुरा अग्निशमन विभागाला सायंकाळी 6ः45 वाजता कॉल प्राप्त झाला. उपअधिकारी डी. डी. साळुंके यांनी सहकाऱ्यांसह कंपनीकडे धाव घेतली. शहरातून अग्निशमनचे सहा बंब, पाण्याचे आठ पेक्षा अधिक खासगी टँकरद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.