आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - संग्रामनगर येथे सुरू असणार्या उड्डाणपुलाचा अंडरपासच्या कामांमुळे जवळपास लाखो नागरिकांचा जीव गेल्या महिन्यापासून मेटाकुटीस आला आहे. टीचभर अंतरासाठी डायव्हर्शन आणि गल्ल्यांच्या चक्रव्यूहातून वाट काढता काढता वाहनचालकांच्या नाकी नऊ येत आहेत. वेळ वाढला, इंधनाचा खर्च वाढला, जागोजाग वाहतुकीची कोंडी वाढली. त्यामुळे लोकांचे हाल सुरू आहेत. डिझाईन चुकल्याची चर्चा असलेल्या पुलाच्या कामासाठी महिनाभरापासून रस्ता बंद आहे.
या प्रकरणी आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयतन केला असता त्यांनी या प्रकरणी बोलणे टाळले. आता या प्रकरणी कुणी विधीमंडळात हा प्रश्न उपस्थित करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा-देवळाई परिसरातील लोकांना शहरात येण्यासाठी फेरा मारावा लागतोय.
बीड बायपासला जोडणारा संग्रामनगरचा अंडरपास गेली अनेक दिवस तयार होतोच आहे. सातारा परिसरातील लाखो लोकांच्या लोकवस्तीला औरंगाबाद शहराशी जोडणारा हा रस्ता आहे. कंत्राटदाराने पुलाच्या दोन्ही टोकांना डायव्हर्शनचा फलक लावून टाकला आहे. यामुळे सातारा परिसरातील लोकांना फिरून काहींना 1 तर काहींना 2 किमीचा फेरा मारावा लागतोय आणि वाहतुकीची कोंडी सहन करत प्रवास करावा लागत आहे.
बीड बायपासवरील संग्रामनगर उड्डाणपुलाच्या उंचीबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मते पुलाखालील रस्त्यापासून पुलाची उंची साडेपाच मीटर आहे. जमीनस्तरापासून पुलाची उंची 3.8 मीटर तर जमीनस्तरापासून 1.7 मीटर खोल भुयारी मार्ग आहे. जमीनस्तरापासून 1.7 मीटर खोल भुयारी मार्ग आहे.
काय होते नुकसान
सातारा परिसरातील रहिवाशी असद पटेल म्हणाले की, संग्राम नगर पुलाचे काम हे खुप चुकीचे झाले आहे, कारण पुलांची जर उंची वाढवली असती तर मोठी वाहने सहजपणे पुलाखालून निघली असती. तसेच दोन्ही बाजूला जे खड्डे करूण ठेवले आहे. याची पण गरज पडली नसती. सातारा-देवळाई वासियांसाठी हे दुर्दैव आहे. नेमका कोणता संबधित अधिकारीचा स्वार्थ होता काय माहित, यामुळे नक्कीच भविष्यात मोठ्या संमस्याना तोंड द्यावे लागेल असे मत व्यक्त केले आहे.
नेमका हा प्रकार सुरू असताना अधिकाऱ्यांना याच पूलानजीक असलेल्या आमदाररोड समोर दुसरा पर्यायी मार्ग ठेवणे आवश्यक होते, मात्र तो ठेवण्यात आला नाहीये. आमदाररोडवरुन येणाऱ्या वाहनधारकांना राजकमल हॉटेलपासून बेबडे रुग्णालयाकडे जावे लागताना दिसून येत आहे. यामुळे परिसरातील रस्त्याचा आणि बीडबायपासचा डायरेक्ट संबंधच राहिला नसल्याचे दिसून येत आहे. यावर कुणीच लोकप्रतिनिधी लक्ष घालताना दिसून येत नाहीये. आता या प्रकरणी कुणी विधीमंडळात आवाज उठवणार का असा सवाल नागरिकांना पडला आहे.
औरंगाबाद शहरातील शहानिरमियाँ दर्गा चौक-संग्रामनगर उड्डाणपूल ते बीड बायपास-गोदावरी टी या मार्गावरील वाहतूक 6 फेब्रुवारीपासून 30 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहर पोलिस दलाचे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी याबाबत आदेश काढले होते. मात्र, आज 8 मार्च उजेडला असूनही रस्ता सुरू न झाल्याने नागरिकांना कितीदिवस मनस्ताप सहन करावा लागणार असा प्रश्न पडला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.