आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीचा फटका:छत्रपती संभाजीनगर शहरात 9.1 मिमी तर ग्रामीणमध्ये 8.9 मिमी पावसाची नोंद

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीज पडून एक जणांसह 12 पशुधनांचा मृत्यू - Divya Marathi
वीज पडून एक जणांसह 12 पशुधनांचा मृत्यू

शुक्रवार चार वाजेनंतर व सहा ते रात्री दहा वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह जोरदार टपोऱ्या थेंबांचा पाऊस पडला. तुरळक ठिकाणी गारपीटही झाली. शहरात अवकाळी पावसाने चाकारमाने, वाहन चालकांची त्रेधा उडवली. तर ग्रामीण भागात रब्बी व फळ, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. विजेच्या प्रहाराने तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. एक व्यक्ती आणि 12 पशुधनांचा मृत्यू झाला आहे. चिकलठाणा वेध शाळेने शहरात 9.1 मिमी तर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात 8.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे.

उत्तरेत बर्फवृृष्टी व पाऊस पडतो आहे. अतिशीत व समुद्रावरून बाष्पयुक्त वारे वाहून येत आहेत. उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे. थंड, उष्ण, बाष्पयुक्त वाऱ्यांचा आकाशात संगम होऊन पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे गत दोन दिवसांपासून सकाळच्या सत्रात तापते. दुपारी कमी हवेचा दाब तयार होतो. सापेक्ष आर्द्रता 75 ते 100 टक्क्यांवर जाते, वातावरणात तापमानही पोषक राहते. अशा ठिकाणीच वादळ तयार होते व मेघ गर्जनेसह काही वेळेतच धो धो पाऊस पडतो आहे. आकाशातील 65५ डिग्री उणे तापमानात पाण्याच्या गारा तयार होतात. त्यामुळे गारपीटही होत आहे.

पावसाचे सावट कायम

हवामानातील अनपेक्षित बदलामुळे आज सायंकाळी व उद्या आणि पुढेही काही दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ढगांची गर्दी, पाऊस, उकाडा असे वातावरण अनुभवयास मिळेल. आरोग्यासाठी, फळपिकांसाठी हे वातावरण अयोग्य आहे. त्यामुळे योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

मराठवाड्यातील स्थिती

7 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर 8.9 मिमी, जालना 4.9, परभणी 0.5, हिंगोली 0.1, नांदेड 4.9, बीड 0.3, लातूर 8.8 आणि उस्मानाबाद 0.6 मिमी व मराठवाड्यात एकुण 4.1 मिमी पाऊस पडला. विज पडून एक व्यक्ती व 24 पशुधन दगावल्याची नोंद विभागीय आयुक्तलयाने घेतली आहे. कालच्या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरलाच बसल्याचे अहवालातून स्पष्ट होते.