आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर..:जिल्ह्यात 87 शाळा बोगस, 18 जणांकडे 'एनओसी' अन् 17 स्कूलला मान्यताच नाही, फसवणूक केल्यास शाळांवर कारवाई - शिक्षण विभाग

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालकांची फसवणूक करुन सीबीएसई, आयसीएसई पॅटर्न असल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात मात्र प्रोजड असलेल्या शाळा मान्यता असल्याचे सांगून पालकांची दिशाभूल करत आहेत. अशा एकूण ८७ छोट्या मोठ्या शाळा जिल्हयात आढळून आल्या आहेत. ज्यापैकी १८ शाळा शाळांकडे एनओसी नाही तर १७ शाळांकडे मान्यताच नाही त्या प्रस्तावित असल्याचे समोर आले आहे. या अनुषंगाने आता शिक्षण विभागाने पालकांनी प्रवेश घेतांना खबरदारी घ्यावी अशा सूचना केल्या आहेत. तसेच शाळांनी देखील पालकांची फसवणूक केल्यास कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.

कोणतीही शाळा सुरु करतांना त्याचा नियमानुसार प्रस्ताव शासनाला पाठवणे, शिक्षण विभागास देणे आवश्यक आहे. शाळांना शासनच मान्यता देत असते. मात्र २०१२ मध्ये सेल्फ फायनान्स अॅक्ट आला. त्यानंतर मोठया प्रमाणात स्वयंअर्थसहाय्यित असलेल्या शाळांच्या संख्येत वाढ झाली आहे. सीबीएसई, आयसीएसई पॅटर्न असल्याची शाळा म्हणून पालकांना भासविण्यात येते. प्रत्यक्षात मात्र शाळांकडे सीबीएसई असो वा आयसीएसई त्यांच्या मान्यता आणि अॅफिलेशन क्रमांक असणे आवश्यक आहे. बऱ्याचवेळा भौतिक सुविधा देखील शाळेत नसताना आणि नियमानुसार पात्र शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी नसतांना शाळांकडून दिखावूपणा केला जातो. शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीत अशा जिल्हयात ८७ शाळा आढळून आल्या आहेत. या अनुषंगाने नुकतीच शिक्षण विभागाने सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांची बैठक घेवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी अशी कानउघडणी केली आहे.

कोट -

बोर्डाच्या संकेतस्थळावर पालकांनी करावी पहाणी -

जिल्हयात सीबीएसई आणि आयसीएसई पॅटर्न असल्याचे भासवून पालकांची शाळा फसवणूक करतात. असे काही प्रकार समोर आले आहेत. तशा अनधिकृत शाळांची यादीच आम्ही जाहिर करणार आहोत. आता शाळांच्या प्रवेशांना लवकरच सुरुवात होईल. तेंव्हा पालकांनी देखील प्रवेश घेतांना त्या त्या बोर्डाच्या संकेतस्थळावर यादीत शाळेचे नाव आहे का तपासूण पाहिले पाहिजे. तसेच शाळांनी अॅफिलेशन क्रमांक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावणे आवश्यक आहे.

एम.के.देशमुख माध्यमिक शिक्षणाधिकारी

चौकट -

शिक्षण विभागातील शाळांची आकडेवारी याप्रमाणे -

सीबीएसई - ५५, आयसीएसई ५ आणि आयबी १