आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीच्या निकालात जिल्ह्यात मुलांपेक्षा ३.४५ टक्के जास्त मुली झाल्या उत्तीर्णकोरोना संसर्गाच्या कालावधीत दिलेल्या सवलतींमुळे ९९.५३ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा बारावीचा निकाल साथ ओसरल्यानंतर सवलती मागे घेतल्याने ९३.५६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
मात्र, विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे यंदाचे प्रमाण कोरोनापूर्व काळातील निकालाच्या तुलनेत वाढले आहे. विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने पहिला क्रमांक कायम राखला आहे. विशेष म्हणजे मुलींनी परंपरा राखत सलग तिसऱ्या वर्षी निकालात बाजी मारली.
यंदा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत ३.४५ टक्क्यांनी जास्त आहे. दरम्यान, कोरोना साथीच्या काळात विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव राहिला नसल्याचा परिणाम निकालावर झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे, तर काॅपीमुक्ती अभियानामुळे निकाल घसरल्याचा दावा शिक्षणाधिकाऱ्यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (२५ मे) दुपारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ५९ हजार ५२१ विद्यार्थी बसले होते. यात ३५ हजार ११९ मुले तर २४ हजार ४०२ मुली होत्या.
कोरोनापूर्वीच्या तुलनेत यंदा निकाल वधारलावर्ष निकाल
२०१८ ८९.१५
२०१९ ८९.२२
२०२० ८७.७६
२०२१ ९९.५३
२०२२ ९६.५६
२०२३ ९३.५६
(निकाल टक्क्यांमध्ये)
कोरोनाची बॅच, निकालावर परिणाम होणारच
कोरोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांना वाचनाची, लिखाणाची आणि अभ्यासाची सवय नव्हती. तरीदेखील विद्यार्थ्यांनी उत्तम पद्धतीने पेपर लिहिण्याचा प्रयत्न केला असून उत्तम गुणदेखील घेतले. ही कोरोनाची बॅच असल्यामुळे या वर्षी निकालात घसरण झाली आहे. - मंगल मुरंबीकर, उपप्राचार्य, विवेकानंद महाविद्यालय.
लेखनाचा सराव कमी झाल्याने घसरणकोरोनाकाळात विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला होता. त्याचबरोबर विद्यार्थी हल्ली बारावीच्या परीक्षेपेक्षा स्पर्धा परीक्षांकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे यंदाचा निकाल घसरला आहे. - मकरंद पैठणकर, प्राचार्य, स. भु. महाविद्यालय.
कॉपीमुक्त परीक्षेचा निकालावर परिणामया वर्षी १२ वीच्या परीक्षेत काॅपीमुक्ती अभियान राबवण्यात आले. त्यामुळे निकालाची टक्केवारी घसरली आहे. मात्र, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे. - एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी.
गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल ५.९७ टक्के घसरला६,११५ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुणजिल्ह्यात एकूण ५९ हजार ५२१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ६,११५ एवढीच आहे. ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २३,३८२ एवढी असून, द्वितीय श्रेणीत २२ हजार ३३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर उत्तीर्ण श्रेणीत ३, ८६३ विद्यार्थी आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.