आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘नमस्कार, तुमची मुलगी, मुलगा दहावी अथवा बारावीत शिकतोय का? तुमच्या घरात शाळेत जाणारी पंधरा वर्षांपर्यंतची मुले आहेत का?’ असे फोन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक पालकांना येत आहेत. रोज चार-पाच फोन तरी असेच शाळा अथवा क्लास लावण्यासाठी भंडावून सोडत आहेत. मात्र, सर्व मुलांची अथवा पालकांची वैयक्तिक माहिती मिळते तरी कुठून, असा प्रश्न पालकांना पडला आहे.
विशेष म्हणजे शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनाही , ‘तुम्हाला क्लास लावायचा का?’ अशी विचारणा करणारे फोन आले आहेत. या प्रकारामुळे आता शिक्षण विभागही सजग झाला असून एकाही विद्यार्थ्याची आणि त्याच्या पालकांची माहिती, फोन नंबर सार्वजनिक होणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, अशा कडक शब्दांत शिक्षण विभागाने पत्राद्वारे सर्व शाळांना ताकीद दिली आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्यावर सध्या विविध प्रकारच्या सीईटी, प्रवेशपूर्व परीक्षांचा हंगाम सुरू आहे. लवकरच प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार आहे. अशा वेळी महाविद्यालयातून अथवा एखाद्या शाळेतून विद्यार्थ्यांचा डेटा गोळा कसा काय केला जातो, असा प्रश्न आता शिक्षण विभागालाही पडला अाहे. विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांची वैयक्तिक माहिती कोणतीही शाळा इतरांना देऊ शकत नाही, असे शिक्षणाधिकारी एम. के. देेशमुख यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत खुद्द शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाही असाच अनुभव आला असून ‘नमस्कार सर-मॅडम, तुम्ही ... बोलत आहात का? तुम्हाला क्लास लावायचा का? तुमच्या घरात कुणी लहान मुलं आहेत का?’ अशी विचारणा करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची वैयक्तिक माहिती बाहेर येते कशी, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे कुणालाही माहिती देण्यात येऊ नये अशी तंबी आता शाळांनाच देण्यात आली आहे.
विद्यार्थी सुरक्षा महत्त्वाची
क्लास असो वा शाळा, अशा प्रकारचे कोणाचेही फोन आले तर पालकांच्या केवळ तोंडी तक्रारी येतात. असे काही होत असल्यास त्यांनी शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार करायला हवी. आम्ही शाळांना यापूर्वीही आणि आता पुन्हा विद्यार्थी-पालकांची माहिती गोपनीय ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. विद्यार्थी सुरक्षा महत्त्वाची आहे. असे प्रकार करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- एम. के. देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी शाळांना तंबी } विद्यार्थी-पालकांची वैयक्तिक माहिती देऊ नका
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.