आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:वाळूजच्या एनआरबी बेरिंग्स लिमिटेड कंपनीला आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर ​​​​​​​22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेरिंग्सचे उत्पादन घेणाऱ्या वाळूज औद्योगिक परिसरातील एनआरबी बेरिंग्स लिमिटेड कंपनीला सोमवारी (दि.8) पहाटे सहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी प्रशासन, गरवारे कंपनीच्या अग्निशमन दलाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र चार तासांचा अवधी उलटूनही आग आटोक्यात आलेली नव्हती.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज कंपनी प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस पोहोचलेले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. सदरील आग कंपनीच्या गोडाऊनला लागण्याची माहिती पुढे येत आहे.