आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिशन क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. या रोमांचक स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या मुलींच्या १४ वर्षांखालील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद आपल्या नावे केले. सांगली संघाने विजेतेपद पटकावले.
छत्रपती संभाजीनगर संघाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रसन्ना पळणीटकर, राष्ट्रीय प्रशिक्षक गणेश बेटुदे यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर संघाला प्रशिक्षक ज्योती रत्नपारखी (गायकवाड), मयूरी चव्हाण, ईश्वरी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. उपविजेता संघ : वैष्णवी भोंडे, स्नेहल पाटील, कांचन कुबडे, भूमिका परांडे, निशा गरड, समीक्षा खराटे, अदिती सरवटे, आंचल हिवराळे, सायली तांदळे आणि अभया जाधव.
सांगलीकडून पराभव स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा अंतिम सामना कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सांगली जिल्हा संघाशी झाला. या फायनलमध्ये बलाढ्य सांगलीने छत्रपती संभाजीनगरच्या संघावर एकतर्फी ५-० ने विजय मिळवत अजिंक्यपद राखले. संभाजीनगरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उपविजेत्या संघाकडून स्नेहल पाटील, कांचन कुबडे, समीक्षा खराटे, आंचल हिवराळे यांचे प्रयत्न अपुरे पडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.