आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र दिनी मानापमान नाट्य; खैरे, भुमरे, शिरसाटांमध्ये रंगली जुगलबंदी

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र दिनी छत्रपती संभाजीनगरात आयोजित कार्यक्रमात मानापमान नाट्य पाहायला मिळाले. माजी खासदार तथा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पालकमंत्री संदीपान भुमरेंवर घटनाबाह्य पालकमंत्री अशी टीका केली.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरेंनी लोकशाही मान्य केली पाहिजे, असे म्हणत प्रत्युत्तर दिले. तर आमदार संजय शिरसाट यांनी खैरेंच्या बोलण्याला पक्षात आणि बाहेर काही किंमत नाही म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला.

भाषण ऐकले नाही

चंद्रकांत खैरे म्हणाले की, संदीपान भुमरे घटनाबाह्य पालकमंत्री आहेत. त्यांचे भाषण ऐकण्याचा संबंध नाही, मागील वेळेसही आम्ही त्यांचे भाषण ऐकले नाही, पालकमंत्री पद किती दिवस आहे आता, असा सवालही चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे.

युतीची सत्ता पाहवत नाही

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना लोकशाही समजली नाहीच, असा टोला यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी लगावला आहे. त्यांना जी युतीची जी सत्ता आली आहे, ती पाहावली जात नाही, खैरेंवर न बोलणेच योग्य आहे. खैरेंनी लोकशाही मान्य केली पाहिजे पालकमंत्री कोण आहे, त्यापेक्षा त्यांचा संदेश ऐकायला हवे हे महत्त्वाचे आहे. खैरेंना हे अजून युतीची सत्ता आली हे पचत नाहीये, असा टोलाही भुमरेंनी लगावला आहे.

बकवास बोलणे बंद करा

शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट म्हणाले की, जर चंद्रकांत खैरे यांना पालकमंत्री संदीपान भुमरेंचे भाषण ऐकायचे नव्हते तर खैरे का आले होते. तुम्हाला निवेदने देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाहिजेत. खैरेंनी हे बकवास बोलणे आता बंद केले पाहिजे, थोडे समजूतदारपणे बोलेले पाहिजे असा सल्ला संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांना दिला आहे. तर आता तुम्ही लोकप्रतिनिधी नाही म्हणून असे बोलणे योग्य नाही, तशी त्यांच्या बोलण्यास ना पक्षात आणि बाहेर देखील किंमत नाही, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.