आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनातील आरोपीचा कोर्टात धिंगाणा:सिगारेट, तंबाखू, डबा नेऊ द्या म्हणत पोलिसांना घेतला चावा, वाॅरंट फाडत केला आत्महत्येचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारागृहात आम्हाला सिगारेट, तंबाखू तसेच घरचा डबा नेऊ द्या, अशी मागणी करत खुनातील आरोपींनी जिल्हा न्यायालयात सोमवारी धिंगाणा घातला. पोलिसांशी धक्काबुक्की करून हाताला चावा घेत एकाने अटक वॉरंट फाडले, तर दुसऱ्याने पोलिसांच्या गाडीवर डोके आपटून स्वत:ला जखमी करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

याप्रकरणी राहुल युवराज पवार, गणेश रवींद्र तनपुरे व ऋषिकेश रवींद्र तनपुरे यांच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

९ ऑगस्ट, २०२१ रोजी हनुमाननगरात गणेश, ऋषिकेश, राहुल, मंगल तनपुरे आणि संदीप त्रिंबक जाधव यांनी आकाश रूपचंद राजपूतची (२१) हत्या केली होती. प्रकरणात पवार, तनपुरे हर्सूल कारागृहात आहेत. ८ मे रोजी त्यातील सात जणांना पोलिस अंमलदार मच्छिंद्र पाडळे अन्य पोलिसांनी कारागृहातून न्यायालयात सुनावणीसाठी हजर केले.

पुढील तारीख वाढवून मिळाल्याने वॉरंट ताब्यात घेऊन पोेलिस पुन्हा त्यांना घेऊन जात असताना तिघांनी पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. गणेश तनपुरेने रिमांड वॉरंट फाडून तर राहुलने डोके आपटून तुमच्या नावाने आत्महत्या करतो, अशी धमकी दिली.