आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:छत्रपती संभाजीनगर अन्न प्रक्रिया‎ उद्योगात देशात दुसरे, राज्यात पहिले‎

प्रवीण ब्रह्मपूरकर | छत्रपती संभाजीनगर‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर तालुक्यातील गळनिंब येथील ३५ वर्षीय युवक‎ सचिन मुळे गंगापूरमध्ये नोकरी करत होते. त्यांनी नोकरी‎ सोडली आणि दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरू केला. उद्योगातून‎ ते सध्या चौघांना ५० हजार रुपये रोजगाराच्या माध्यमातून‎ पैसे देतात, तर स्वत: एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत‎ आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत त्यांना १७ लाख‎ रुपयांचे कर्ज मिळाले होते. दररोज ७०० लिटर दुधावर‎ प्रकिया करून दही, लस्सी, श्रीखंड, मसाला ताक यांचे‎ उत्पादन व विक्री केली जाते. यावर्षी पंतप्रधान सूक्ष्म‎ अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे छत्रपती संभाजीनगरमधील‎ ५५६ अन्न प्रक्रिया उद्योगाचे प्रस्ताव मंजूर झाले असून‎ देशात सिमला (६१८) पहिल्या आणि छत्रपती‎ संभाजीनगर दुसऱ्या क्रमांकावर आहे.‎ पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या‎ माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया‎ उद्योगाचे जाळे निर्माण होत आहे. अन्न प्रक्रियेच्या‎ माध्यमातून शेतकरी उद्योजक होत आहे. जिल्हाधिकारी‎ या समितीचे अध्यक्ष असून दर तीन महिन्यांनंतर आढावा‎ बैठकदेखील घेतली जाते. या योजनेच्या माध्यमातून‎ उद्योग सुरू करणाऱ्यांना ३५ टक्के सबसिडी मिळते.‎

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५५६ प्रस्तावांना मिळाली मंजुरी‎ देशात हिमाचल प्रदेशातील सिमला पहिल्या क्रमांकावर‎

गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी दूध‎ डेरी प्रोजेक्ट सुरू केला आहे.‎ ग्रामीण भागात अर्थकारणासाठी फायदा‎ अन्न प्रक्रिया प्रकल्पामुळे जिल्ह्यात अर्थकारण सुधारण्यासाठी त्याचा फायदा‎ ‎ होत आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २००, तर‎ ‎ एसबीआयने ३०८ प्रस्ताव मंजूर केले आहेत. या अन्न प्रक्रिया‎ ‎ उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोटी रुपयांचे‎ ‎ कर्ज वाटप केले आहे. प्रक्रिया उद्योगामुळे ग्रामीण भागातील‎ ‎ अर्थकारण झपाट्याने बदलत आहे.‎ ‎ - मंगेश केदार, व्यवस्थापक, अग्रणी बँक‎

मराठवाडा आघाडीवर‎ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून‎ १,७१२ जणांनी अर्ज केले होते.‎ त्यापैकी १,३२४ जणांनी प्रकल्पासाठी‎ अर्ज केले होते. मराठवाड्यात बीड‎ १८, जालना जिल्ह्यातील ७७ प्रस्ताव‎ मंजूर झाले आहेत. लातूर विभागात‎ हिंगोली ०७, लातूर ९२, नांदेड ६१,‎ धाराशिव ९१, परभणी ३७, असे २८८‎ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.‎

ग्रामीण भागात अर्थकारणासाठी फायदा‎ अन्न प्रक्रिया प्रकल्पामुळे जिल्ह्यात अर्थकारण सुधारण्यासाठी त्याचा फायदा‎ ‎ होत आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २००, तर‎ ‎ एसबीआयने ३०८ प्रस्ताव मंजूर केले आहेत. या अन्न प्रक्रिया‎ ‎ उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोटी रुपयांचे‎ ‎ कर्ज वाटप केले आहे. प्रक्रिया उद्योगामुळे ग्रामीण भागातील‎ ‎ अर्थकारण झपाट्याने बदलत आहे.‎ ‎ - मंगेश केदार, व्यवस्थापक, अग्रणी बँक‎

ग्रामीण भागात अर्थकारणासाठी फायदा‎ अन्न प्रक्रिया प्रकल्पामुळे जिल्ह्यात अर्थकारण सुधारण्यासाठी त्याचा फायदा‎ ‎ होत आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २००, तर‎ ‎ एसबीआयने ३०८ प्रस्ताव मंजूर केले आहेत. या अन्न प्रक्रिया‎ ‎ उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोटी रुपयांचे‎ ‎ कर्ज वाटप केले आहे. प्रक्रिया उद्योगामुळे ग्रामीण भागातील‎ ‎ अर्थकारण झपाट्याने बदलत आहे.‎ ‎ - मंगेश केदार, व्यवस्थापक, अग्रणी बँक‎

प्रक्रिया उद्योग उभारा‎ शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगदेखील‎ ‎ उभारावेत यासाठी‎ ‎ प्रयत्न केले जात‎ ‎ आहेत. गेल्या वर्षी‎ ‎ सुरू केलेले दीडशे‎ ‎ प्रक्रिया उद्योग‎ ‎ यशस्वी सुरू असून‎ सर्व जण बँकेत व्यवस्थित कर्जफेड‎ करत आहेत.‎ - प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी‎ अधीक्षक‎

शेतकऱ्यांना फायदा‎ मला १७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर‎ ‎ झाले होते. माझ्या‎ ‎ गावात पूर्वी शंभर‎ ‎ लिटर होणारे दूध‎ ‎ संकलन आज‎ ‎ ७०० लिटर झाले‎ ‎ आहे. शेतकऱ्यांनी‎ असे प्रक्रिया उद्योग सुरू केले तर‎ अर्थकारण सुधारेल. शेतकऱ्यांनी‎ याचा लाभ घेतला पाहिजे.‎ - सचिन मुळे, डेअरी उद्योजक, गंगापूर‎

बातम्या आणखी आहेत...