आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:राज्य फुटबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरचा कनिष्ठ संघ जाहीर; यश खरात करणार संघाचे नेतृत्व

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाईन ए साईड स्पोर्टस फुटबॉल असोसिएशन महाराष्ट्र व नाईन ए साईड हौशी फुटबॉल असोसिएशन यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 वर्षातील राज्य फुटबॉल स्पर्धेचे 2 व 3 एप्रिल रोजी यवतमाळ येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरचा 14 सदस्यीय कनिष्ठ संघ शनिवारी जाहीर करण्यात आला. संघाच्या कर्णधापदी यश खरातची निवड करण्यात आली.

आमखास मैदानावर झालेल्या चाचणीतून जिल्हा संघात अनुभवी व नवोदित खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर संघाच्या प्रशिक्षकपदी डी.आर. खैरनार यांची जिल्हा संघटनेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. संघात निवड झालेल्या खेळाडूंचे महाराष्ट्र राज्य व जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव प्रा. एकनाथ साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष बद्रोद्दिन सिद्दिकी, लाईक खान आदींनी अभिनंदन केले व राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती संभाजीनगरचा संघ पुढीलप्रमाणे

यश खरात (कर्णधार), वैभव शेळके, गणेश शिरसाट, शिव वाघ, गौरव कुकलारे, सुमित देवकर, आदर्श दाभाडे, गणेश दांडगे, सविनय मिसाळ, हर्षल तळेकर, श्रवण फुलारी, संदेश निरफळ, पियुष बोराडे, सुमित भंडारे. प्रशिक्षक डी. आर. खैरनार आणि संघ व्यवस्थापक पांडुरंग कदम.

राज्य स्पर्धेत 30 संघ होणार सहभागी

यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील जवळपास 30 संघातील 450 खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंची निवास, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वैद्यकिय पथक सज्ज ठेवले आहे. विजेत्या संघांना चषक व पदक, प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रथम साखळी सामने नंतर बाद फेरीमध्ये सामने खेळले जातील. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. जो पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल.