आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन पुरवठा प्रकरणी:जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याविरोधात कन्नडचे 6 जण उतरले सलीम अली सरोवरात; अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील मकरनपूर गावातील 6 जण सलीम अली सरोवरच्या पाण्यात उतरले आहेत. कन्नड तालुक्यातील रेशन पुरवठा प्रकरणात 6 जणांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

यामध्ये दोन महिला तसेच चार पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये महिला आणि पुरुषांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विरोधात देखील हे आंदोलन करते घोषणाबाजी करत आहेत. 12 वाजेपासून हे लोक पाण्यात उतरल्यामुळे पोलिस देखील आले आहेत. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच तहसीलदार विजय राऊत हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत या गावातील नागरिकांना गावातील नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमला आहे. पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आले आहे कन्नड पुरवठा अधिकाऱ्यंविरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.