आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कश्मिर टू कन्याकुमारी रेस अक्रॉस इंडिया स्पर्धा:शहरातल्या 4 सायकलिस्टने 5 दिवस 18 तासात पूर्ण केली 3651 किलोमीटरची शर्यत

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टायगर मॅन स्पोर्ट्स प्रा. लिमिटेडच्या वतीने आयोजित कश्मीर ते कन्याकुमारी (के टू के) रेस अक्रॉस इंडिया स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या शर्यतीत छत्रपती संभाजीनगरच्या चार सायकलपटूंनी खुल्या गटात 5 दिवस 18 तास 50 मिनिटाच्या विक्रमी वेळेत 3561 किलोमीटरची शर्यत पूर्ण केली.

भारतात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 18 वर्षावरील गटात सहभागी झालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या संघात चरणजीत सिंग संघा, अमोघ जैन, मनीष खंडेलवाल व निखिल कचेश्वर यांचा सहभाग होता.

हे चारही जण सायकलिंगमध्ये मास्टर आहेत. एसआर, बीएमआर, घाट का राजा असे अनेक बिरुद त्यांनी नावे लागलेले आहेत. ही स्पर्धा विविध चार गटात होत असून औरंगाबादची टीम सांघिक चार जणांचा रिले प्रकारात रस्त्यावर उतरेले होते. आणखी चार दिवस ही स्पर्धा चालणार आहे. अत्यंत कठिण अशी स्पर्धा होती. वातावरणाचा देखील यावर परिणाम झाला. कश्मीरमध्ये प्रचंड थंडी तर, दक्षिणेत प्रचंड गर्मी होती. डोंगर रांगा, घाट, वळणार रस्ते, जड वाहतूक अशा गोष्टींचा सामना त्यांना करावा लागला. ही आशियाई खंडातील पहिलीच लांब पल्याची स्पर्धा असल्याचा दावा आयोजक नागपूरच्या डॉ. अमित समर्थ यांनी केला आहे.

जेवण व झोप चारचाकीत, नॉनस्टाॅप रेस

ही शर्यत ८ दिवसांत पूर्ण करायची होती, मात्र छत्रपती संभाजीनगरच्या टीमने साडेपाच दिवसांतच पूर्ण केली. स्पर्धेकांना कुठेही थांबवण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच संघाने आपल्या गरजेच्या खाण्याचे, सायकल दुरूस्तीचे, झोपण्याची व्यवस्था सर्व गोष्टी दोन चारचाकीमध्ये केल्या होत्या. जेवण व झोप हे सदस्यांनी गाडीत घेतली. पेट्रोलपंप इतर ठिकाणी सायकलिस्ट फ्रेश झाले. दोन-दाेन जणांची टीम बनवली होती. एक सायकलिस्ट व एक गाडी पुढे सतत मार्गक्रमण करत राहिला. एक जण गाडीत विश्रांती घेत होता.

प्रत्येक सदस्याला जीपीएस ट्रॅकर

स्पर्धेत सहभागी प्रत्येक सदस्याला जीपीएस ट्रॅकर लावण्यात आले होते. या रेसमध्ये एकच सदस्य सायकलिंग करते. तो बदली झाल्यानंतर आयोजकांना तसा संदेश द्यावा लागत होता. मार्गावर आयोजकांचे १३ चेक पाँईट होते. तसेच शेकडो सदस्य स्पर्धकांवर लक्ष्य ठेवून होतो. त्याचा अहवाल वेळोवेळी नोंदवला जात होतो.

श्रीनगरवरुन सुरुवात

या स्पर्धेला श्रीनगर येथून सुरूवात झाली होती. भारतातील उत्तर टोक ते दक्षिण टोक अशी ही शर्यत आहे. यात एनएच 44 मार्गावर उधमपूर, पठाणकोट, जालंधर, लुधिकाना, अंबाला, नवी दिल्ली, अाग्रा, ग्वाल्हेर, झाशी, सिवनी, नागपूर, अदिलाबाद, हैदराबाद, कुर्नूल, बंगळुरू, सेलम, मदुराई, तिरुनेलवेली मार्गे कन्याकुमारी येथे शर्यत समाप्त झाली.

बातम्या आणखी आहेत...