आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी गेल्या ७ महिन्यांपासून दिवसरात्र केलेेल्या कामामुळे जनावरांचा बळी घेणारा ‘लम्पी’ आजार जिल्ह्यातून नाहीसा झाला आहे.
दरम्यान, ‘लम्पी’मुळे जिल्ह्यामध्ये १३१२ जनावरांचा बळी गेला आहे . अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मोठे आव्हान
खान्देश आणि विदर्भामध्ये या आजाराचा अधिक प्रसार झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यात तो वाढू शकतो ही भीती असल्यामुळे पशुसंवर्धन विभागासमोर मोठे आव्हान होते. जि.प.च्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांच्या नेतृत्वाखाली तुटपुंजे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी असताना सर्वांनी जीवाचे रान केले.
विशेष म्हणजे डॉ. माने या स्वत: सर्वत्र फिरत होत्या. जिल्ह्यातील १४८ बाधित गावांमध्ये १२ हजार ८२ जनावरांना लम्पीची बाधा झाली. यापैकी १३१२ जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये ५६८ गायी, ४७७ बैल आणि २६७ वासरांचा समावेश आहे.
जनावरांच्या मालकांना मदत
मृत जनावरांच्या मालकांना मदतीचे वाटप करण्यात आलेले आहे. ४३७ गायींसाठी १ कोटी ३१ लाख १० हजार रुपये, ३९१ बैलांसाठी ९७ लाख ७५ हजार आणि १९६ वासरांसाठी ३१ लाख ३६ हजार रुपये असे एकूण २ कोटी ६० लाख २१ हजार रुपये वाटप करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.