आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर दखल:न्यायालयाची नाेटीस पाठवून महावितरणने केली कारवाई, मराठवाड्यातील थकबाकीदार ग्राहकांकडून 504 कोटी वसूल

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वीज वापर करायचा अन् बिलाचे पैसे भरण्याकडे पाठ फिरवायची. यामुळे विजेचे पैसे वसूल होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. थकबाकीदारांना अनेक वेळा सूचना देऊनही दखल न घेणाऱ्या मराठवाड्यातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ४४,६१९ ग्राहकांना न्यायालयीन नोटिसा अर्थात रिकव्हरी सूट पाठवण्यात आल्या होत्या. अशा ग्राहकांकडून ५०४.४३ काेटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

महावितरणला वीज विकत घेऊन ग्राहकांना पुरवठा करावा लागतो. विकलेल्या विजेचे पैसे दरमहा वसूल होत नसल्याने अनेक वेळा नोटिसा, सूचना, एसएमएस करून थकबाकीदार ग्राहकांकडे पाठपुरावा केला जातो. मात्र थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा विद्युत कायद्यानुसार कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करून मीटर वायर काढून आणले जाते. त्यानंतर ग्राहक वीज बिलाच्या थकबाकीचा भरणा न करता कानाडोळा करत असल्याने महावितरणच्या वीज बिलाचा महसूल थकीत राहून डोंगर वाढतच राहतो.

या ग्राहकांकडे थकीत वीज बिलासाठी पाठपुरावा करूनही दखल न घेणाऱ्या ग्राहकांना महावितरणने वसुलीसाठी रिकव्हरी सूट अर्थात न्यायालयीन नोटिसा बजावल्या हाेत्या. यामध्ये घरगुती ग्राहक, औद्योगिक व इतर ग्राहकांचा समावेश आहे.

महावितरणला सहकार्य करा

मराठवाड्यातील कायमस्वरूपी खंडित थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा ग्राहकांनी बिलाचा भरणा न केल्यास त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी वकिलाच्या फीचा खर्च, मानसिक त्रास, न्यायालयीन वेळ याचा त्रास सहन करावा लागेल. न्यायालयीन नोटिसा अर्थात रिकव्हरी सूट पाठवण्यात आलेल्या ३७ ग्राहकांनी विलंब न लावता थकबाकीचा भरणा करावा.

वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

न्यायालयात दाखल नोटिसा व वसूल रक्कम अशी