आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोरगरीब मराठा समाजाला टिकणारे आरक्षण का दिले जात नाही? राजकीय षड्यंत्र थांबवा आणि ५ मे राेजी सायंकाळपर्यंत सरकारने आरक्षणावर निर्णय घ्यावा, अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या वतीने आंदाेलन करणाऱ्या रेखा वहाटुळे व दिव्या पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी १ मेपासून क्रांती चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. सर्वच पक्षांनी मराठा समाजावर अन्याय केला आहे. ५० टक्क्यांच्या आतील किंवा आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावता येतो. त्याची अंमलबजावणी केली गेली नाही. त्रुटी ठेवून आरक्षण दिले गेले. ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही.
विशेष म्हणजे राजकीय फायद्यासाठी सर्वच पक्षांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणूनबुजून तेवत ठेवला. यामुळे समाजाचे अतोनात नुकसान झाले. आरक्षणासाठी आजवर आयोग नेमले होते. त्यांच्या शिफारशी लागू करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी का काढला नाही? आता पुन्हा नव्याने आयोग नेमणार, मग ते पुन्हा अभ्यास करणार, त्यानंतर
शिंदे-फडणवीस सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे. ते मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. क्रांती चौकात सकल मराठा समाजातर्फे आरक्षणासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण द्यावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.
मराठा समाज अनेक सामाजिक बाबतीत मागास असून त्यांना आरक्षण नसल्याचे दानवे म्हणले. आंदोलकांनी आरक्षण मिळाले नाही तर आत्मदहन करू, असा इशारा दिला. तेव्हा दानवे यांनी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढली.
महाराष्ट्र दिनापासून सकल मराठा समाजातर्फे क्रांती चौकात बेमुदत आंदोलन सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकार टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जात आहेत, परंतु मराठा आरक्षणासाठी ते काहीही करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या वेळी दानवे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत.
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी केंद्रातील भाजप व व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची भावना आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडल्याचा आरोपही दानवेंनी केला. या वेळी चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सतीश वेताळ, रेखा वहाटुळे, दिव्या पाटील, सुकन्या भोसले, मनोज गायके आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.