आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामसिआतर्फे आयाेजित टी-20 क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण पोलिस संघ शहर पोलिस संघावर वरचढ ठरला. गरवारे स्टेडियमवर झालेल्या लढतीत ग्रामीण पोलिसांनी शहर पोलिसांवर 6 गडी राखून मात केली. या लढतीत शुभम हरकळ सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शहर पोलिसांनी 20 षटकांत 4 बाद 159 धावा उभारल्या. यात सलामीवीर आर्यन शेजूळ 7 धावांवर परतला. पांडूरंग गाजेने 19 धावा केल्या. अनुभवी फलंदाज प्रदीप जगदाळेने 28 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचत 41 धावा ठोकल्या. अजय काळेने 38 चेंडूंत 6 चौकार लगावत नाबाद 48 धावांची खेळी केली. सुदर्शन एखंडे 13 धावा करु शकला. राहुल जोनवालने 7 चेंडूंत 2 षटकार खेचत नाबाद 19 धावा जोडल्या.
ग्रामीण पोलिसांकडून कल्याण बहुरे, विजय जाधव, संदीप जाधव, गणेश गोरक्ष यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केला.
शुभम, विकासची फटकेबाजी
प्रत्युत्तरात ग्रामीण पोलिस संघाने 18.1 षटकांत 4 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर विकास नगरकरने फटकेबाजी करत 17 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचत 34 धावा ठाेकल्या. युवा फलंदाज शुभम हरकळने 44 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 4 उत्तुंग षटकार मारत नाबाद 70 धावांची विजयी खेळी केली. यष्टिरक्षक फलंदाज अविनाश मुकेने 12 धावा केल्या. विजय जाधवने 13 धावांचे योगदान दिले. संघाला 20 धावा अतिरिक्त मिळाल्या. शहर पोलिसांकडून अष्टपैलू प्रदीप जगदाळे 21 धावा देत 2 फलंदाज टिपले. आर्यन शेजुळ व राहुल जोनवालने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.