आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांशी कमिटमेंट:​​​​​​​‘अपना तो वसूल है, पहले मुलाकात, फिर बात, अगर जरूरत पडी तो लात’, अशा पद्धतीने काम करू- जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

“नियमित घरपट्टी अन् नळपट्टी भरणाऱ्यांना मनपाचे जन्म, मृत्यूचे दाखले घरपोच देण्यात येतील. त्यासाठी तंंत्रज्ञत्रानाचा वापर करू. नागरिकांना मनपाच्या खेटे मारण्याची गरज पडणार नाही, अशी आदर्श व्यवस्था निर्माण केली जाईल. कमी मनुष्यबळात ‘झोमॅटो’ जर घरपोच सेवा देत असेल तर मनपा का नाही देऊ शकत?’ असा प्रतिप्रश्न करत मनपाचे नवे प्रशासक जी. श्रीकांत यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केली.

याविषयी लवकरच अधिकृत घोषणाही केली जाणार आहे. स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी मनपा मुख्यालयातून एक पावती आणावी लागते. ती स्मशानजोगीला दाखवली तरच तो आत साेडताे. ही पद्धत अत्यंत चुकीची व मनस्तापाची आहे. सर्व स्मशानजोगींना ट्रेनिंग दिले जाईल. आता मृतदेह अंत्यविधीसाठी थेट स्मशानभूमीत जातील. त्याची सुरुवात केली आहे. पण एवढ्यावर न थांबता मृत्यूचा दाखला घरपोच देऊ. जन्माच्या दाखल्यालाही रांगा लावण्याची गरज नाही. नळपट्टी अन् घरपट्टी नियमित भरणाऱ्यांना आम्ही सर्वच प्रकारचे प्रमाणपत्र हव्या त्या ठिकाणी हव्या त्या वेळेतच देऊ. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. आधार अपडेशनची गरज पडली तर तेही करू, असेही श्रीकांत यांनी सांगितले.

माझी कमिटमेंट २० लाख नागरिकांशी

मी येथे दबंगगिरी करण्यासाठी आलो नाही. कुशल प्रशासक म्हणून काम करू. तिरंगा या हिंदी सिनेमातील राजकुमार यांचा प्रसिद्ध संवाद त्यांनी म्हणून दाखवला ‘अपना तो वसूल है, पहले मुलाकात, फिर बात, अगर जरूरत पडी तो लात’ अशा पद्धतीने काम करू. कारण आपली कमिटमेंट २० लाख नागरिकांशी आहे.

माझे व्हिजन २०३८ पर्यंतचे

मी अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलो. आयएएस होण्यापूर्वी तिकीट कलेक्टर होतो. पण त्याच वेळी मी आयएएस होण्याचे ठरवले अन् झालोही. मी तीन वर्षांसाठी असलो तरीही माझे व्हिजन पुढील १५ म्हणजेच २०३८ पर्यंतचे असेल. राज्य, देशातच नव्हे तर जगभरातून आम्ही चांगले मॉडेल येथे आणू. त्याची प्रभावी अंमलबजावणी करू.

समुपदेशनानंतर ४५ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेणार

आत्तापर्यंत ४५ पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यारी निलंबित आहेत. अाधी त्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करण्यात येईल. मग, कुटुंबीय निलंबितांचे समुपदेशन करतील. अशा सर्व निलंबितांवर विश्वास व्यक्त करून त्यांना लवकरच सेवेत घेणार आहे. कारण त्यांची प्रॉडक्टिव्हिटी नष्ट करण्याऐवजी त्यांच्याकडून मी काम करून घेण्यावर भर देईन. माझ्या काळात जर कुणी दोषी आढळले तर त्यांना थेट काढून टाकू. मात्र अनवधानाने चूक झाली तर त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे श्रीकांत म्हणाले.