आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत तिघांची सुवर्णपदकाला गवसणी:80 खेळाडूंनी घेतला सहभाग; विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव

छत्रपती संभाजीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत तिघांनी शानदार कामगिरी करत सुवर्ण पदके पटकावली.सिल्लोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत शिवांश अकाते, अजिनाथ राठोड, अमान पटेल, संस्कृती लक्कस यांनी आपपाल्या गटात सर्वोत्तम खेळी करत पहिला क्रमांक मिळवला.

जिनियस चेस अकादमी व समर्थ करिअर डेव्हलपमेंट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कौचलवाडीचा संघ सर्वोत्कृष्ट ठरला.

80 खेळाडूंचा सहभाग

या स्पर्धेत 9, 14 वर्षाखालील व खुल्या अशा तीन गटात एकूण 80 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरसह जालना, बुलढाणा, बीड, हिंगोली, जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह आणि पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्याचबरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विकास लक्कस, माजी सैनिक प्रेमसिंग राजपूत, किशोर वराडे, दिपक समिंद्रे, गजानन सोनटक्के, चरणसिंग राजपूत यांची उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजक तथा मुख्य प्रशिक्षक मयुरेश समिंद्रे यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल

बालगट - वीर बारोटे. महिला खेळाडू - संस्कृती लक्कस. ९ वर्ष गट - युवराज चरावंडे (प्रथम), शिवांश अकाते (द्वितीय), स्वराज बावस्कर (तृतीय), प्रथमेश बारवल (चौथा), विहान झाल्टे (पाचवा). १४ वर्ष गट - अर्णव सोनटक्के (प्रथम), आजिनाथ राठोड (द्वितीय), तनय कव्हाळे (तृतीय), पारस खिलोसिया (चतुर्थ), ओम चरावंडे (पाचवा). खुला गट - अमान पटेल (प्रथम), निखिल चौथमल (द्वितीय), निखिल चरावंडे (तृतीय), गोपाल चरावंडे (चतुर्थ), बालाजी मोरगे (पाचवा). सर्वोत्कृष्ट शाळा - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कौचलवाडी, ता. अंबड.

बातम्या आणखी आहेत...