आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात प्रेम जुळले नंतर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार:तरुणीकडून लाटले 95 हजार रुपये!, तरुणावर अत्याचाराचा गुन्हा

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका नामांकित रुग्णालयात साफसफाईचे काम करणाऱ्या तरुणाने तरुणीला लग्नाचे आम्ही दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि थापा मारून वेळोवेळी 95 हजार रुपये घेतले. हा प्रकार 26 9 2022 ते एक मार्च 2023 यादरम्यान नगर गारखेडा परिसरात घडला. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार शुभम बाळू गवळी (वय 24, रा. न्यायनगर, गारखेडा) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहीतीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी तरुणी (वय 34) व आरोपी हे दोन्ही गारखेड्यातील एका हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे काम करतात. त्याच ठिकाणी त्यांची ओळख झाली व मैत्री होऊन प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर शुभमने तरुणाला लग्न करण्याचे वारंवार आमिष दाखवले व तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध केले. पैशाची गरज आहे असे सांगून त्याने तिच्याकडून वेळोवेळी फोन पे द्वारे व नगदी 95 हजार रुपये घेतले. शुभमने तिला लग्न करू असे सांगून नंतर लग्न करण्यास टाळाटाळ केली. सुमारे सहा महिन्यांपासून लग्नाचे आमीष दाखवून तरुणीसोबत बळजबरीने वारंवार शारीरिक संबंध करून तिची फसवणूक केली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल झाला. तपास संदीप काळे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...