आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवारी सकाळी 8 वाजताच सेव्हन हिल्स परिसरातील चित्रपटगृहाचे प्रांगण महिला-तरुणींनी फुलले होते. फेअर्ड जीन्स, क्रॉपटॉप घातलेल्या तरुणी सेल्फी काढण्यात दंग होत्या, पण त्यांच्या डोक्यावर कोणत्याच टोप्या नव्हत्या. काही वेळातच आयोजक आले आणि त्यांनी प्रेक्षक तरुणींना भगव्या टोप्या वाटल्या.
हे इथेच थांबले नाही तर यापुढे जाऊन त्या टोप्या घालून स्वत:च्या इन्स्टाग्रामला लाइक करून घेणे, भगवाच स्कार्फ घाला असा आग्रह करणे येथपर्यंत हे राजकीय नाट्य सुरू होते. आपण पक्षाचे पदाधिकारी नाही असे सांगणाऱ्या या आयोजकाच्या गळ्यात मात्र भाजपच्या निशाणीची पट्टी होती. सिनेमानंतरही त्याने व्याख्यान देत काही लोकांच्या दुकानातून खरेदी करू नका, काही परिसरात जाऊ नका आणि भगवे स्कार्फ वापरा, असा राजकीय प्रचार सुरूच ठेवला होता.
७० हजार रुपये खर्चून पुढील ८ दिवसांसाठी या चित्रपटाची तिकिटे भाजपच्या या पदाधिकाऱ्याने खरेदी केली आहेत आणि ती मोफत वाटली जात आहेत. सकाळचा शो असला तरी हा चित्रपट हाऊसफुल्ल होता. तरुणी व महिलांची येथे गर्दी होती. घरपोच मोफत तिकिटे वाटण्यात आल्याने आम्ही आल्याचे उपस्थित तरुणींनी सांगितले. उपस्थित महिला व तरुणी आयोजकांनी दिलेल्या भगव्या टोप्या घालून सिनेमाला बसल्या.
भगवा स्कार्फ घाला
चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षागृहातच आयोजक तरुणाने माइकचा ताबा घेतला. काही वस्त्यांत फिरू नका, त्यांच्याकडून खरेदी करू नका, बाहेर फिरताना भगवे स्कार्फ घाला, डोक्यावर चंद्रकोर काढा, काही लोकांकडून खाऊ नका असा विखारी प्रचार ते सिनेमागृहात ते करत होते. पुढील आठवड्यात या चित्रपटाचे ८ शो बुक करण्यात आले आहेत.
हा माझा वैयक्तिक उपक्रम
हा माझा वैयक्तिक उपक्रम आहे. याचा भाजपशी काहीच संबंध नाही. समाजात जागृती आणण्यासाठी आम्ही हे करत आहोत. आम्ही ७० हजार रुपये खर्च करून पुढील ८ दिवसांसाठी या सिनेमाचे बुकिंग केले आहे.
- राहुल बोरुळे, आयोजक, द केरला स्टोरी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.