आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना व नाशिक जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 33 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या संघाने मुलामुलींच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. कोल्हापूर मुलांनी उपविजेतेपद व लातूर संघ तृतीय स्थान मिळवले. मुलींमध्ये द्वितीय रायगड व लातूर संघाने तृतीय स्थान मिळवले आहे.
या स्पर्धेतील वैयक्तिक प्रकारील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या संघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विजेतेपद पटकावणाऱ्या 9 खेळाडूंची निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडूंचे साईचे संचालक नितीन जयस्वाल, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष. एस.पी.जवळकर, गोकुळ तांदळे, मंजूताई खंडेलवाल, डॉ. दिनेश वंजारे, तुकाराम म्हेत्रे, स्वप्नील तांगडे, प्रा. सागर मगरे आदींनी अभिनंदन करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
छत्रपती संभाजीनगरचे विजेते खेळाडू
वैयक्तिक फाॅईल - तेजस पाटील (सुवर्ण), शाकीर सय्यद (कांस्य). मुली - वैदेही लोहिया (सुवर्ण). इप्पी - ऋषभ जाधव (सुवर्ण), स्नेहल पाटील (कांस्य). सेबर - अभय शिंदे (सुवर्ण), निखिल वाघ (कांस्य). मुली - कशिश भराड (सुवर्ण), हर्षदा वंजारे (कांस्य).
फाॅईल संघ - शाखेर सय्यद, तेजस पाटील, ओम वाघ, गौरव गोटे (सुवर्ण). मुली - वैदेही लोहिया, हर्षदा वंजारे, हर्षदा वडते, मानसी हुलसुरकर (कांस्य). इप्पी मुले - ऋषभ जाधव, यश वाघ, महेश कोर्डे, प्रशिक साळवे (रौप्य). इप्पी - हर्षदा वडते, गायत्री कदम, स्नेहल पाटिल, योगिनी देशमुख (कांस्य). सेबर - निखिल वाघ, अभय शिंदे, विशाल दानवे, श्रेयस जाधव (सुवर्ण). मुली - कशिश भराड, हर्षदा वांजारे, गुनगुन जाधव, अक्षता भवरे (सुवर्ण)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.