आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव:15 ते 25 मार्च 10 दिवस साजरा होणार, समितीची पत्रकार परिषदेत घोषणा

छत्रपती संभाजीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव 15 ते 25 मार्च असा दहा दिवस साजरा होणार असल्याची माहिती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, वेरूळ या ठिकाणी भोसले घराण्याच्या पराक्रमी व कर्तृत्ववान वास्तव्याने पावन झालेली भोसले कुटुंबीयांची गढी देखील आहे. वेरुळच्या याच गढी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा 18 मार्च 1594 रोजी जन्म झाला होता. शहाजीराजेंनी आपल्या अतुलनीय कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. निजामशाही, मोगलाईत त्यांनी स्वतंत्र बाण्याचे पराक्रमी सरदार म्हणुन मोठा नाव लौकिक मिळविला होता.

पुणे जाहागिरीवर पाठवले

इ.स. 1963 मध्ये अदिलशाहीत बंगलोरची जहागीरी मिळाल्यावर त्यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले दुसरे पुत्र बाल शिवाजी यांना सुयोग्य प्रशिक्षण देऊन सर्व शास्त्रात पारंगत झाल्यावर त्यांनी आपली पत्नी जिजाऊ व पुत्र बाल शिवाजी यांना इ.स. 1642 मधे उंच भगवा ध्वज, राजमुद्रा, विश्वासु सहकारी, सैनिक व धनद्रव्य देऊन आपल्या पुणे जाहागिरीवर पाठवले. याच बाल शिवाजींनी जिजाऊ व शहाजी राजेंच्या प्रेरणेने बहुजनांच्या लोक कल्याणकारी राज्याची स्थापना केली.

शासनाच्या विरोधात आंदोलन

अशा या महापराक्रमी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या मालकीची वेरुळ येथील भोसल्यांची गढी गेली अनेक वर्षे दुर्लक्षीत होती. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीने मागील वीस वर्षे कार्य करुन स्मारक उभे करण्यासाठी परिश्रम घेतले असुन 19 फेब्रुवारी 2003 पासुन 12 जानेवारी 2006 असे सतत 3 वर्ष शासनाच्या विरोधात विविध प्रकारे आंदोलने करुन व प्रशासकीय पाठपुरावा केला. त्यामुळे वेरूळ या ठिकाणी एक भव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्माराकाचे काम सुरु झाले. शासनाने या कामी आता पर्यंत 2 कोटी 30 लाख रुपये निधी देऊन या कामाची सुरुवात केली.

उपस्थित राहण्याचे आवाहन

शहाजीराजे भोसले यांची 429 वी जयंतीचा महोत्सव त्यांच्या जन्मस्थळी वेरुळ गढी येथे आयोजित केला आहे. या प्रसंगी शिवप्रेमींनी अभिवादन करण्यासाठी बहु संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.