आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ जलतरण तलावाने उत्पन्नाचे विक्रम मोडले !:चालू आर्थिक वर्षात 76 लाखांचे मिळवले उत्पन्न

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिका कर, भाडेपट्टी आदी वसुलीमध्ये आतापर्यंत नेहमीच मागे राहिली आहे. मात्र, दुसरीकडे मनपाच्या सिद्धार्थ जलतरणिकेने अवघ्या चालू आर्थिक वर्षात 76,89,940 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. यंदा चालू आर्थिक वर्ष संपेपर्यंत मार्च महिन्याअखेरीस सिद्धार्थ तलाव आतापर्यंतचा विक्रमी आकडा गाठला आहे. खेळाडू, नागरिकांची सदस्य नोंदणी, जिम आणि स्पर्धेच्या माध्यमातून उत्पन्न मिळते.

कोरोनामुळे गत तीन वर्षांपासून सिद्धार्थ तलाव बंद होता. 12 एप्रिल 2022 रोजी तो पुन्हा सुरू झाला. हा तलाव 2000 मध्ये सर्वसामान्यांसाठी सुरू झाला. पहिल्या वर्षी 13 लाख उत्पन्न दिले होते. त्यानंतर या आलेखात सतत चढ-उतार होत राहिला. व्यवस्थापक रावसाहेब मालोदे यांच्या कार्यकाळात 2000 ते 2009 पर्यंत 12 लाख रुपये सरासरी उत्पन्न राहिले. त्यानंतर एस.टी. पहाडिया यांनी एक वर्षांत 21 लाख उत्पन्न दिले. सन 2010 पासून अभय देशमुख हे जलतरणिकेचे व्यवस्थापक झाल्यापासून तलावाच्या उत्पन्नात सतत वाढ होत गेली. त्यांनी 1 एप्रिल 2022 ते 1 मार्च 2023 या आर्थिक वर्षामध्ये 2022-23 मध्ये 76,89,940 विक्रमी उत्पन्न मिळवून दिले होते. चालू महिन्यात आणखी थोड्या उत्पन्नाची त्यात भर पडेल. महानगरपालिकचे शहरातील खेळाडूंना मदत म्हणून आणि विविध क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी योगदान देत असते. त्यामुळे चांगले खेळाडूदेखील शहरात घडत आहेत.

काेरोनादरम्यान तलावाची छोटी-मोठी डागडुजी करण्यात आली. त्यावर जवळपास 70 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. कोरोनातून बाहेर पडताच मनपातील नियमित सर्वाधिक उत्पन्न देणारा विभाग म्हणून सिद्धार्थ जलतरणीकेने पुन्हा बाजी मारली आहे.

प्रशासनाचे याेगदान

जलतरण तलावाकडे प्रशासन नियमित लक्ष्य देवून सहकार्य करते. मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, विभाग प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यासह तांत्रिक विभाग, प्रशासक विभाग, ऑडिट विभाग, लेखा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग काम करत आहे.

सभासद संख्या

आजीव 320

वार्षिक 154

त्रैमासिक 54

मासिक 154

फॅमिली 17

एकूण 728

दर्जेदार सुविधा, सुरक्षेवर भर :

दर्जेदार सुविधा आणि सुरक्षेवर भर यामुळे सध्या शहरातून हजारो जलतरणपटू येथे येत आहे. आतातर सर्व बॅचही फुल झाल्या आहेत. या कारणाने आम्ही गेल्या 17 वर्षांतील सर्वाधिक उत्पन्न मिळवले. -अभय देशमुख, मुख्य प्रशासक, जलतरण तलाव

बातम्या आणखी आहेत...