आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलांच्या शैक्षणिक कमतरता दूर करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्येही गुणवत्ता सुधारण्यासाठी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी 3500 माता पालकांचे गट स्थापन करण्यात आले असून, मातांना प्रशिक्षण देवून मुलांना हसत-खेळत शिक्षणाचे धडे हे सुटीच्या कालावधीत दिले जाणार आहे.
कोरोनानंतर विद्यार्थ्यांच्या भाषा आणि गणित विषयातील घसरलेली गुणवत्ता, लेखन वाचनाच्या त्रूटी लक्षात घेऊन पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न होणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा उपक्रम होणार आहे.
शैक्षणिक नुकसान
कोरोनानंतर विद्यार्थ्यांची शैक्षणीक गुणवत्ता ढासळल्याचे असरच्या अहवालातूनही समोर आले आहे. भाषा ज्ञान, वाचन, उजळणी, अंक गणितातही विद्यार्थी मागे पडले. यात विशेषत: प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे 50 टक्क्यांहून अधिक शैक्षणिक नुकसान झाल्याचे समोर आल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर विविध प्रकारच्या कृतीयुक्त शिक्षणातून उपाय केले जात आहे. साहित्य पेटीचाही वापर केला जातो आहे.
पालकांचे गट स्थापन
अंगणवाडीतून पहिल्या वर्गात येणाऱ्या आणि पहिली ते चौथी, पाचवी ते सहावी अशा वर्गातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जिल्हयात साडेतीन हजार माता पालकांचे गट स्थापन करण्यात आले आहेत. परीक्षा झाल्यावर त्यांना प्रशिक्षण देत घरी मुलांची तयारी कशी करावी यासाठी टिप्स दिल्या जाणार आहेत.ज्यामुळे माता, पालक, मुलांच्या गुणवत्ता सुधारणेसाठी शाळांना मदत करु शकतील.
प्रशिक्षण देणार
मातापालक आणि शिक्षक यांचे गट करण्यात आले असून, समाजमाध्यमातूनही काही चित्र, व्हिडिओच्या माध्यमातून मातांनी सुटीच्या कालावधीत मुलांच्या गुणवत्तेसाठी सहकार्य करायचे आहे. यात ज्या माता पालक साक्षर नाहीत अथवा ज्यांच्याकडे सुविधा नाहीत अशा माता पालकांना गटातील इतर माता मदत करतील. शिक्षकांकडून त्यांना घरातील साहित्यचा वापर करुन गणित, भाषा व्यवहार ज्ञान देतील. यासाठी प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण म्हणाल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.