आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीतील 14 वर्षाखालील टेनिस चॅम्पियनशिप:छत्रपती संभाजीनरगच्या श्रीनाथ, अक्षरीने पटकावले उपविजेतेपद

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी येथे नुकत्याच झालेल्या १४ वर्षाखालील टेनिस चॅम्पियनशिप सिरीजमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या श्रीनाथ कुलकर्णी व अक्षरी मंडलिक या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. हे दोन्ही खेळाडू विभागीय क्रीडा संकुल येथील एन्ड्यूरन्स एमएसएलटीए मराठवाडा टेनिस सेंटरचे खेळाडू आहेत.

मुलांच्या गटात अंतिम फेरीत कोल्हापूरच्या अथर्व डकरे याने छत्रपती संभाजीनगरच्या श्रीनाथ कुलकर्णी याचा ६-२, ६-२ असा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. श्रीनाथला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सामन्यात श्रीनाथला अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नाही. उपांत्य फेरीत श्रीनाथ कुलकर्णी याने विश्वजित चौधरीला नमवून अंतिम फेरी गाठली होती. उपांत्यपूर्व सामन्यात श्रीनाथने साताराच्या यश भवर याचा ९-३ असा पराभव केला हाेता. या खेळाडूंना प्रशिक्षक प्रविण प्रसाद, गजेंद्र भाेसले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या यशबद्दल टेनिस सेंटरचे प्रमुख आशुतोष मिश्रा, प्रविण गायसमुद्रे यांनी अभिनंदन केले

वीराकडून अक्षरीचा पराभव

मुलींच्या गटात अंतिम फेरीत पुण्याच्या वीरा काकडे हिने छत्रपती संभाजीनगरच्या अक्षरी मंडलिक हिचा ६-१० ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. अक्षरी मंडलिक उपविजेता ठरली. दोन्ही डावात अनुभवी वीराने आपल्या लौकिकाला साजेशा खेळ केला. तिने अक्षरीचा सामन्यात परतण्याची संधी दिली नाही व एकतर्फी लढत आपल्या खिशात घातली. तत्पूर्वी उपांत्य सामन्यात अक्षरी मंडलिक हिने बीडच्या अनुष्का महामुनी हिचा २-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. उपांत्यपूर्व सामन्यात अक्षरी मंडलिक हिने नांदेडच्या लुंबिनी कांबळे हिचा ९-३ असा पराभव केला होता.