आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर विमानतळावरून देशाच्या इतर शहरांना विमानसेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बंगळुरूची विमानसेवा २८ मार्चपासून सुरू हाेणार अाहे. उडान-१ मध्ये वापर न झालेल्या उदयपूर-छत्रपती संभाजीनगर मार्गाचा समावेश आता उडान ५ मध्ये करण्याची मागणी केली जात आहे. उडान योजनेत समावेश केल्याने विमान कंपन्या सेवेसाठी पुढे येतील. कंपन्यांना या माध्यमातून आर्थिक सुरक्षा मिळत असल्याने फायदा मिळतोय.
छत्रपती संभाजीनगर येथून मुंबई आणि हैदराबादसाठी इंडिगोची दोन सत्रांत विमानसेवा आहे. इंडिगोची दिल्लीसाठी एक सत्रात तर एअर इंडियाची मुंबई आणि दिल्लीसाठी एक सत्रात सेवा सुरू आहे. इंडिगो उन्हाळी सत्रासाठी २८ मार्चपासून बंगळुरूचे विमान सुरू होईल. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून सुनीत कोठारी आणि जसवंतसिंह राजपूत यांनी २ मार्चला इंडिगो, एअर इंडिया, अलायन्स एअर आणि नागरी उड्डयन विभागातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. “उडान’मध्ये समावेशाने आशा उंचावेल : “उडान १’ मध्ये उदयपूर-छत्रपती संभाजीनगर सेवेचा समावेश केल्यानंतर जेट एअरवेजला परवानगी मिळाली होती. कंपनी बंद झाल्याने विमानसेवा बंद पडली. नव्याने या मार्गाचा समावेश “उडान पाच’मध्ये केल्यास येथून विमान कंपनीला सेवा सुरू करण्यास मदत मिळेल. उडान मार्ग विमान कंपनीला फायदेशीर ठरतो. संबंधित मार्गातील तोट्याची हमी शासनामार्फत घेतली जाते. नवीन पर्यटन वर्ष सुरू होण्यापूर्वीच विमान कंपन्या मार्ग निश्चित करतात. यातून परदेशी पर्यटकांची सोय होते.
अहमदाबाद, उदयपूरसाठी प्रयत्न
चिकलठाणा विमानतळावरून अहमदाबादला आठवड्यातून चार दिवस विमानसेवा सुरू होती. शहरातील व्यावसायिकांसह विदेशी पर्यटकांसाठी छत्रपती संभाजीनगर ते उदयपूर हा मार्ग सोयीस्कर आहे. त्यामुळे या विमानासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईसाठी सकाळ आणि सायंकाळच्या विमानाला चांगला प्रतिसाद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.