आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुलंब्रीच्या पाल येथील एचएसजे क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात माहायाना क्रिकेट अकादमीने रोमांचक विजय मिळवला. बुधवारी झालेल्या सामन्यात माहायानाने कनिष्ठ जाधव इलेव्हन संघावर १ गडी राखून मात केली. यात कबिर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जाधव इलेव्हन संघाने २६.१ षटकांत सर्वबाद १०१ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात माहायाना संघाने २५.२ षटकांत १०७ धावा करत विजय साकारला. यात संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर प्रसाद पांचाळ ३, आदित्य १, मयंक ९ धावांवर परतले. दुसरा सलामीवीर पालवने ४९ चेंडूंत ६ चौकारांसह ३३ धावा काढल्या. अनय पवार, अनुज व आर्यन पवार भोपळाही फोडू शकले नाहीत. साई सपकाळने १२ चेंडूंत १ चौकारांसह ११ धावा केल्या. तळातील फलंदाज कबिरने ५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकार खेचत नाबाद २२ धावांचे योगदान दिले. संघाला २४ धावा अतिरिक्त मिळाल्या. जाधव इलेव्हनकडून प्रेषित शेजुळने ३८ धावा देत ५ फलंदाजांना तंबूत पाठवले. आर्यन कदमने २ आणि कुणाल केलानी, कृष्णा येडेटकरने प्रत्येकी एक एक गडी टिपला.
जाधव संघाची फलंदाज ढेपाळली
तत्पूर्वी, जाधव इलेव्हन संघाचा डाव १०१ धावांवर ढेपाळला. यात सलामीवीर तथा कर्णधार आर्यन कदम ६ धावांवर परतला. आयुष परहादने सर्वाधिक ११, तळातील फलंदाज कार्तिकने १० व आदित्यने नाबाद १० धावा काढल्या. इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. माहायानाकडून अष्टपैलू कबिरने १४ धावा देत ३ गडी बाद केले. पलव, प्रसाद पाचांळ, साई सपकाळ यांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.