आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल:छत्रपती संभाजीनगर विजयी; हर्षचे 3 गोल

छत्रपती संभाजीनगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेस्टर्न इंडियन फुटबॉल असोसिएशन, धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ वर्षांखालील सबज्युनियर मुलांच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या संघाने शानदार विजयी सलामी दिली. शिरपूर (धुळे) येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ३३ संघांनी सहभाग नोंदवला. छत्रपती संभाजीनगरच्या संघाने सुरुवातीलपासून वर्चस्व राखत भंडारा संघाला ८-० ने पराभूत करत विजयी अभियान सुरू केले. लढतीत भंडारा संघाच्या खेळाडूंना मोठी कसरत करावी लागली.

हर्ष, रोहित, अब्दुल, चमकले :
सामन्यात छत्रपती संभाजीनगरकडून हर्ष पाटीलने सर्वाधिक ३ गोल केले. पोरस मिसाळने दोन आणि हर्षवर्धन नंदुरे, रोहित घोडके, अब्दुल रहमान यांनी प्रत्येकी एक-एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सर्वेश घुगे, अर्फिन खान, पार्थ मोहेकर व नुमान खान यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. संघाचा वेगवान व आक्रमक खेळ सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. छत्रपती संभाजीनगर संघाचा दुसरा सामना शुक्रवारी जळगाव जिल्हा संघासोबत होणार आहे.