आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारणे अस्पष्टच:सका‌ळी वडिलांशी गप्पा मारल्यानंतर पदवीधर तरुणाने केली आत्महत्या, शहरात 2 तरुणांनी संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळी वडिलांसोबत चहा पीत गप्पा मारल्यानंतर प्रतीक प्रकाश खेमनार (२५) या पदवीधर तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी दुपारी बारा वाजता ही घटना समोर आली. हर्सूल परिसरातही मंगळवारी सिल्लोड तालुक्यातील संदीप साहेबराव गोरे (३३) या तरुणाने एका हाॅटेलच्या गार्डनमधील झाडाला गळफास घेत आयुष्य संपवले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजले नाही.

प्रतीक खेमनार कुटुंबासह विमानतळ परिसरातील म्हाडा कॉलनीत राहत होता. त्याने ३ मे रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन काम केले. त्यानंतर वडिलांसोबत चहा घेतला आणि आपल्या खोलीत गेला. कामानिमित्त वडिलांनी त्याला हाक मारली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने वडील त्याच्या खोलीत गेले असता प्रतीक लटकलेल्या अवस्थेत आढळला.

त्यांची आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घाेषित केले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे अंमलदार राजू काेतवाल हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. प्रतीकच्या वडिलांची मेस आहे. त्याच्या पश्चात वडील, आई, एक बहीण असा परिवार आहे.

दुसरी घटना मंगळवारी हर्सूल भागातील नंदादीप हॉटेलमध्ये समोर आली. सिल्लोड तालुक्यातील संदीप गोरे या ३३ वर्षीय तरुणाने या हॉटेलच्या गार्डनमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली. मध्यरात्रीच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हर्सूल पोलिस पुढील तपास करत आहेत.