आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार स्वीकारला:छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण झाले रुजू

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून १९९३ च्या बॅचचे पोलिस अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण शुक्रवारी रुजू झाले. मावळते विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांच्याकडून त्यांनी दुपारी महावीर चौक येथील कार्यालयात पदभार स्वीकारला.

आठ दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाकडून राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची मुंबई येथील पोलिस महासंचालक कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) येथे बदली झाली. तर मुंबईचे अपर पोलिस आयुक्त डॉ. चव्हाण यांची त्यांच्या जागी परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

शुक्रवारी सकाळी डॉ. चव्हाण यांनी प्रसन्ना यांच्याकडून पदभार स्वीकारला. ऑगस्ट २००२ ते नोव्हेंबर २००५ या काळात ते शहरात गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त होते.